⁠ 
रविवार, जानेवारी 5, 2025
Home | गुन्हे | जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर! अवैध वाळू उपसा करणाऱ्या आठ ट्रॅक्टरवर कारवाई

जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर! अवैध वाळू उपसा करणाऱ्या आठ ट्रॅक्टरवर कारवाई

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात सध्या अवैध वाळू वाहतूक प्रकरण तापले असून गेल्या काही दिवसापूर्वी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांना आळा घालायला गेलेल्या महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ला झाला होता. तसेच वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अनेकांना जीवावर मुकावे लागले आहे. यामुळे आता जिल्हा प्रशासनाकडून कडक कारवाई केली जात आहे. अशातच धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावाजवळ असलेल्या गिरणा नदी पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या आठ ट्रॅक्टरवर कारवाई केली. या कारवाईत आठ ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आणि संबंधित 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगाव शहरापासून जवळ असलेल्या बांभोरी गावातील किरण नदीपत्रातून अवैधपणे वाढू उपसा करणाऱ्या आठ ट्रॅक्टर वर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये अक्षय भास्कर पाटील, उज्वल कैलास पाटील, गणपत पुंडलिक नन्नावरे, जितेंद्र लक्ष्मण नन्नावारे, विशाल विजय सपकाळे, किरण त्रंबक पाटील, ज्ञानेश्वर गुलाब पाटील सर्व रा. पाळधी, बांभोरी आहेत.

यांच्यावर कारवाई करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आठ ट्रॅक्टरवर केलेली कारवाई ही एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यामुळे पर्यावरण संरक्षण आणि कायद्याचे पालन करण्याच्या दृष्टीने एक सकारात्मक संदेश दिला जातो. भविष्यातही असे अवैध प्रकार रोखण्यासाठी पोलीस पथकाने निरंतर कारवाई करणे आवश्यक आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.