बातम्यावाणिज्य

जानेवारीमधील बँक सुट्ट्यांची यादी जाहीर; जाणून घ्या किती दिवस बँका बंद राहतील?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नवीन वर्ष 2025 च्या आगमनाची तयारी संपूर्ण भारतासह जगभरात सुरू आहे. दरम्यान जर तुमचेही बँकेशी संबंधित काही काम असेल तर, तुम्हाला ही बातमी वाचणे आवश्यक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) दर महिन्याला बँकांच्या सुट्ट्यांची (Bank Holidays) यादी प्रसिद्ध करते. जर तुम्ही पुढील जानेवारी महिन्यात बँकिंगशी संबंधित महत्त्वाची कामे पूर्ण करणार असाल, तर तुम्हाला पुढील वर्षी जानेवारी महिन्यात येणाऱ्या बँक सुट्ट्यांची माहिती घ्यावी. RBI ने जानेवारी 2025 मधील बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. Bank Holidays January

त्यानुसार नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच जानेवारीमध्ये देशाच्या विविध भागात १६ दिवस बँका बंद राहतील. यामध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारचाही समावेश आहे. आता तुम्ही घरी बसून बँकिंगशी संबंधित अनेक कामे करू शकता, परंतु तरीही तुम्हाला अनेक कामांसाठी बँकेत जावे लागते. तुम्हीही नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजे जानेवारीत बँकेत जाण्याचा विचार करत असाल तर एकदा सुट्ट्यांची यादी पहा.

जानेवारी 2025 बँकाच्या सुट्ट्यांची यादी
7 जानेवारी 2025- रविवार, देशभरातील बँका बंद राहतील.
11 जानेवारी 2025- मिझोरममध्ये मिशनरी डेनिमित्त बँका बंद राहतील.
12 जानेवारी 2025- स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त पश्चिम बंगालमध्ये बँका बंद राहतील.
13 जानेवारी 2025- महिन्याचा दुसरा शनिवार आणि लोहरीमुळे बँका बंद राहतील.
14 जानेवारी 2025- मकर संक्रांती आणि रविवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.
15 जानेवारी 2025- तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये पोंगलमुळे बँकांना सुट्टी असेल.
16 जानेवारी 2025- तुसू पुजेमुळे पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये बँका बंद राहतील.
17 जानेवारी 2025- गुरु गोविंद सिंह जयंतीनिमित्त अनेक राज्यांतील बँकांना सुट्टी असेल.
20 जानेवारी 2025- रविवार, देशभरातील बँका बंद राहतील.
23 जानेवारी 2025- नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
25 जानेवारी 2025- हिमाचल प्रदेश राज्य दिनानिमित्त राज्यात सुट्टी असेल.
26 जानेवारी 2025- प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात बँका बंद राहतील.
27 जानेवारी 2025- चौथा शनिवार, देशभरातील बँका बंद राहतील.
28 जानेवारी 2025- रविवार, देशभरातील बँका बंद राहतील.
31 जानेवारी 2025- मी-डॅम-मी-फीमुळे आसाममध्ये सुट्टी

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button