लाडक्या बहिणींचा वर्षाचा शेवट गोड; जळगाव जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ डिसेंबर २०२४ । राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे या महिलांमध्ये आनंद व्यक्त केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे थांबलेल्या लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरचे पैसे आता जमा होण्यास सुरू झाली आहे.
लाडक्या बहिणींना १५०० रुपये जमा झाल्याचा मेसेज
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना डिसेंबरच्या हप्त्याचे पैसे मिळण्यासाठी अनेक दिवस वाट पाहावी लागली होती. आता जळगाव जिल्ह्यातील अनेक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात १५०० रुपये जमा झाल्याचे मेसेज आले आहेत. ही बातमी ऐकून महिला आनंदित झाल्या आहेत.
जळगाव जिल्ह्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे आगाऊ दिले गेले होते, पण नंतरचा डिसेंबरचा हप्ता मिळण्यासाठी महिलांना थांबावे लागले होते. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानुसार, येत्या आठवडाभरात सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे १५०० रुपये जमा झाल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.