जळगाव लाईव्ह न्यूज । २५ डिसेंबर २०२४ । डिसेंबर महिना सुरू झाल्यानंतर लग्नसमारंभाना सुरुवात होते. मेपर्यंत लग्नांचा सीझन असतो. त्यामुळं या महिन्यांत सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढते. आज देशात पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळं ग्राहकांच्या चिंतेत पुन्हा वाढ झाली असल्याचे पाहायला मिळतेय. आजच्या दिवशी जर तुम्ही सोनं खरेदी करण्यासाठी बाहेर पडणार असाल तर तुमच्या खिशाला चाप बसू शकतो. याचं कारण म्हणजे आज सोन्याचा दर वाढला आहे.
Goodreturns वेबसाईटनुसार, बुधवारी म्हणजेच आज २५ डिसेंबर रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 100 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 7,76,000 रूपये इतकी आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,115 रुपयांना विकलं जात आहे.
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 56,920 रुपयांवर आहे.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 71,150 रुपये इतका आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
२४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 7,76,000 रुपये किंमतीने विकलं जातंय.
१० ग्रॅम सोन्याचा भाव आज 77,600 रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 62,080 रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं 7,760 रुपयांनी विकलं जात आहे.