गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये ‘एलिगंझा’२०२४ गॅदरिंगचा जल्लोष
सांस्कृतिक कार्यक्रमांनी अनुभवले विद्यार्थ्यांमधील कलाविष्कार
जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या एलेगेंझा २०२४ म्युझिक कन्सर्ट आणि सांस्कृतिक महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य, संगीत, गीत गायनाने पालक अक्षरश: मंत्रमुग्ध झाले. गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या एलेगेंझा २०२४ या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी सुप्रीम इंडस्ट्रीचे महाप्रबंधक ज्ञानदेव महाडिक, मिस एशिया मृणाली चित्ते,गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष चेअरमन डॉ. उल्हास पाटील सर, सचिव डॉ वर्षा पाटील, संचालिका डॉ. केतकीताई पाटील, सदस्य डॉ. अनिकेत पाटील, कार्डिओलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील, एमबीए कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रशांत वारके यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करण्यात आले.
यावेळी अनिल खर्चे, अलका खर्चे, भुसावळ स्कुलच्या प्राचार्या अनघा पाटील, सावदा स्कूलच्या प्राचार्या भारती महाजन ,कु. कृतिका आदी मान्यवर उपस्थित होते. स्कुलच्या प्राचार्या निलीमा चौधरी यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सुप्रीम इंडस्ट्रीचे महाप्रबंधक ज्ञानदेव महाडिक यांनी सांगितले कि, मी खुप भारावुन गेलो. हा माझा मोठा सन्मान समजतो मला इथे निमंत्रित केले. तुम्हि मला उपकृत केल्याचे गौरवोद्गार प्रमुख पाहुणे सुप्रीम इंडस्ट्रीचे महाप्रबंधक ज्ञानदेव महाडिक यांनी व्यक्त केले. ध्येय धरल्यास आकाशहि ठेंगणे होते असेहि महाडिक म्हणाले. यावेळी डॉ. अनिकेत पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि, गोदावरी शाळेला २५ वर्ष पुर्ण झाले आहे. २४ तास गोदावरी स्कुलचे शिक्षक समर्पण वृत्तीने काम करतात. गोदावरी स्कुलची प्रतिष्ठा जपण्याचे कार्य शाळेच्या प्राचार्या आणि प्रत्येक सदस्यानी प्रामाणिकपणे केले असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान म्युझिक कन्सर्टमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याने पालकांना अचंबित केले. सांस्कृतिक कार्यक्रमांनी मिळविली दाद दुसर्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद्घाटन कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, गोदावरी फाउंडेशनचे सदस्य डॉ. अनिकेत पाटील, गोदावरी एमबीए कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रशांत वारके , गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय पाटील,यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. २०२२- २३ तसेच २०२३-२४ या वर्षात दहावी आणि बारावी मध्ये उच्चांक गाठलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले.सांस्कृतिक कार्यक्रमात पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार सादर केले.
या नृत्याविष्काराला पालकांनी टाळ्यांच्या कडकडाटात जोरदार दाद दिली.स्कूलच्या प्राचार्य सौ. निलीमा चौधरी यांनी आपल्या स्कूलचा वार्षिक अहवाल सादर केला.कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला. शाळेच्या व्यवस्थापनाने ‘एलिगंझा’ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिलेल्या शिक्षक, विद्यार्थ्यांना आणि पालकांना धन्यवाद दिले. ‘एलिगंझा’ हा कार्यक्रम शाळेच्या वार्षिक उपक्रमांतील एक महत्त्वाचा क्षण ठरला. कार्यक्रमाच्या शेवटी स्कूलच्या प्राचार्या निलीमा चौधरी यांनी शाळेतील विविध उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीविषयीची माहिती दिली.