⁠ 
गुरूवार, डिसेंबर 5, 2024
Home | बातम्या | मोठी बातमी! महायुती सरकारच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची नावं फायनल, उद्या शपथविधी

मोठी बातमी! महायुती सरकारच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची नावं फायनल, उद्या शपथविधी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ डिसेंबर २०२४ । विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले असून तरी सुद्धा नवीन सरकार स्थापन झालं नाहीय. यातच उद्या ५ डिसेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर या नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. मात्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण होणार याबाबत चर्चा सुरू होती. अखेर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची नावं फायनल झाली आहेत.

महायुतीचं ठरल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहेत. सोबतच २० हुन अधिक मंत्री देखील शपथ घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपने सार्वधिक जागा जिकल्याप्रमाणे राज्यात भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झालं होते. यातच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला होता.

अशातच उद्या देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. सोबतच २० हुन अधिक मंत्री देखील शपथ घेणार असल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली.दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याचा निर्णय घेतला. एकनाथ शिंदे यांना गृह खात्याऐवजी नगरविकास आणि आणखी एखादे महत्वपूर्ण खाते दिले जाणार आहे.

आता शपथविधीसाठी काही तासांचा अवधी उरला असताना शिवसेनेत मंत्री पदासाठी लॉबिंग सुरू आहे. शिवसेनेच्या निवडक ज्येष्ठ मंत्र्यांना उद्या मुंबईत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महत्वाच्या खात्यांसाठी शिवसेनेत लॉबिंग सुरू आहे. नाराजी टाळण्यासाठी मंत्र्यांपासून खात्यांबाबत गुप्तता ठेवली जात आहे. शिवसेनेतून ७ आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागणार आहे. माजी मंत्र्यांच्या यादीतून ३ मंत्र्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता असून त्या ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. अकार्यक्षम, भ्रष्टाचाराचे आरोप आणि वाचाळविर माजी मंत्र्याना शिंदेंकडून नारळ दिला जाणार आहे.

दरम्यान, मंत्रिमंडळात पुणे जिल्ह्याला दोन कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.अजित पवार, चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ,राहुल कुल आणि दत्तात्रय भरणे यांचे नावे चर्चेत आहेत. पुणे जिल्ह्यात अजित पवार, चंद्रकांत पाटील यांना कॅबिनेट तर राहुल कुल किंवा दत्तात्रय भरणे यांना राज्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. दिलीप वळसे पाटील यांनी प्रकृतीच्या अस्वस्थतेमुळे मंत्रिपद नाकारल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मंत्री पद मिळवण्यासाठी विजय शिवतारे यांची लॉबिंग सुरू आहे.

दरम्यान, भाजपचा गटनेता कोण असणार हे आज ठरणार आहे. यासाठी थोड्याच वेळात भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी भाजपचे नेते विधानभवनात दाखल होत आहेत. केंद्रीय निरीक्षकही थोड्याच वेळात बैठकीला पोहचणार आहेत. या बैठकीसाठी भाजपचे निरीक्षक विजय रुपाणी, निर्मला सीतारमण हे कालच मुंबईत दाखल झाले आहेत. भाजपच्या गटनेता निवडीनंतर सत्तास्थापनेचा दावा करण्यात येणार आहे. या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस देखील विधानसभावनाकडे रवाना झाले आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.