⁠ 
बुधवार, नोव्हेंबर 27, 2024
Home | जळगाव जिल्हा | Bhusawal : पर्यायी ट्रान्सफॉर्मरने श्रीनगर मधील वीज पुरवठा सुरळीत करा; प्रा. धिरज पाटील

Bhusawal : पर्यायी ट्रान्सफॉर्मरने श्रीनगर मधील वीज पुरवठा सुरळीत करा; प्रा. धिरज पाटील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । मागील अनेक दिवसांपासून भुसावळ शहरातील श्रीनगर भागात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. रात्री, अपरात्री वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. याबरोबरच कमी-अधिक दाबाने वीजपुरवठा होत असल्याने अनेक नागरिकांच्या घरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खराब झाल्या आहेत. याबाबत विद्युत विभागाला अनेक वेळेस तक्रार करूनही उपाय योजना करण्यात आलेल्या नसल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे.

अनेकवेळा चालू उपकरणे कमी दाबाने वीजपुरवठा झाल्याने बंद पडतात. तसेच वारंवार हा प्रकार होत असल्याने उपकरणांत तांत्रिक बिघाड होतो. यामुळे नागरिकांना या सुविधांचा उपयोगच करता येत नाही. शिवाय दुरुस्तीचा खर्चही सहन करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याबाबत वीज वितरण अधिकाऱ्यांना विचारले असता, नागरिक तक्रार करत असून, ट्रान्सफॉर्मरमध्ये तांत्रिक बिघाड असण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

नुकसानभरपाई मिळालीच नाही:
मागे झालेल्या दुर्घटनेत अनेक ग्राहकांच्या घरातील दूरचित्रवाणी संच, पंखे, फ्रिज, इनव्हर्टर, ट्यूब यासारखी विद्युत उपकरणे जळाली. त्यामुळे लाखोंचे नुकसान झाले. नागरिकांना एक उपकरण दुरुस्त करण्यासाठी किमान आठशे ते तीन हजार रुपयांपर्यंत खर्च लागला होता. महावितरणने पंचनामा केला परंतु नियमावर बोट ठेवत नुकसानभरपाई दिली नाही. या खर्चाचा अचानक बोजा टाकणारे महावितरण नागरिकांना काही दिलासा देणार का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

पर्यायी ट्रान्सफॉर्मरचा वापर करावा:
नागरिक सर्वच उपकरणांना व्होल्टेज स्टॅबिलायझर बसवत नाहीत. काही टीव्ही संचांत ती व्यवस्था असते. कारण सुरळीत वीज पुरवठा ही महावितरणची जबाबदारी आहे. मुळात विजेचा दाब कमी जास्त होण्यात नागरिकांची चूक कशी होऊ शकते. या विभागात बालाजी हाईट्स आणि ठाकूरसिंग बाबा परिसराजवळ पर्यायी ट्रान्सफॉर्मर उपलब्ध आहे याठिकाणचा लोड मॅनेज करून विभागाला जावा अशी मागणी प्रा. धिरज पाटील यांनी केली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.