---Advertisement---
जळगाव जिल्हा महाराष्ट्र राजकारण

धडधड वाढली! पोस्टल मतमोजणी सुरु

---Advertisement---

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live Updates

mahayuti mahavikas aghadi

जळगाव लाईव्ह न्यूज : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान 20 तारखेला पार पडले असून आज मतमोजणी होत आहे. प्रथम पोस्टल मतांची मतमोजणी सुरू झाली असून अवघ्या काही मिनिटांत पहिला कल हाती येणार आहे. कोण विजयी गुलाल उधळणार? हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे. राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा येणार की मविआ मोठा धक्का देणार हेही लवकरच समजेल. 

---Advertisement---

जळगाव जिल्ह्यामध्ये आज 11 विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणीची प्रक्रिया पार पडत आहे. आता अवघ्या काही मिनिटांमध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी पहिल्या टप्प्यात पोस्टल बॅलेट्सची मतमोजणी करण्यात येत आहे. यामध्ये सुरुवातीला महायुतीचे १५ तर महाविकास आघाडीचे १० उमेदवार आघाडीवर असल्याचं दिसत आहे.

२० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं मतदान झालं. ही निवडणूक आजवरची सर्वात चुरशीची निवडणूक ठरली. २८८ मतदारसंघ, आठ प्रमुख पक्ष, तीन आघाड्या, छोटे पक्ष, अपक्ष असे सगळे मिळून रणांगणात उतरलेले ४,१३६ उमेदवार आणि हे ‘महाभारत’ जिंकण्यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी आखलेली रणनीती… अशा वातावरणात मतदारराजाने कुणाला कौल दिला आहे, हे मोठंच कोडं आहे. महायुती की मविआ या बहुचर्चित प्रश्नाचं उत्तर आज मिळणार आहे.

लाडकी बहीण योजनेचा मतदानावर परिणाम

यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा वाढलेला टक्का आणि महिला मतदारांची वाढलेली संख्या हा परिणाम लाडकी बहीण योजनेचा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तशी आकडेवारीही काही ठिकाणची आलेली आहे. परंतु, या वाढलेल्या मतदानाचा लाभ महायुतीला होणार की महाविकास आघाडीला होणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---