जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी एकाच टप्प्यात निवडणुका पार पडल्या. यांनतर निकालाची उत्कंठा राजकीय नेते, कार्यकर्त्यांनाच नाही तर सर्वसामान्यांनाही लागली आहे. या निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मतदारसंघात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. मुक्ताईनगर या मतदारसंघात पूर्वीपासून एकनाथ खडसे यांचं वर्चस्व पाहायला मिळत आहे.
या मतदारसंघात आता खडसेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात आता शिंदे गटाचे चंद्रकांत पाटील जिंकण्याची शक्यता आहे. एका वृत्त समूहाने हा अंदाज वर्तविला आहे. मुक्ताईनगर हा रोहिणी खडसे यांचा गड मानला जायचा. या मतदारसंघात शरद पवार गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट हे आमनेसामने आहेत. रोहिणी खडसेंच्या या बालेकिल्ल्यात आता शिंदे गटाचे चंद्रकांत पाटील बाजी मारणार असल्याचे चित्र दिसत आहेत.
रोहिणी खडसे या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षदेखील आहेत.त्यांना मुक्ताईनगरमध्ये येथे पराभवाला सामोरे जावे लागू शकते. या मतदारसंघात एकनाथ खडसेंची प्रतिष्ठा पणाला लावली होती. परंतु या मतदारसंघात रोहिणी खडसे यांचा पराभव होऊ शकतात
मुक्ताईनगरमध्ये विद्यमान आमदार चंद्रकात पाटील पुन्हा एकदा आमदार होऊ शकतात. त्यांनी विकासकामांच्या जोरावर मते मांडली आहेत. या मतदारसंघात एकनाथ खडसे यांनी मुलगी रोहिणी खडसे यांच्यासाठी प्रचार केला होता. परंतु या मतदारसंघात रोहिणी खडसे यांना लोक नाकारतील, असं दिसत आहे.