संगणक टंकलेखन परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये केला बदल; ‘या’ तारखेपासून सुरु होणार परीक्षा
जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या संगणक टंकलेखन परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. पूर्वीच्या वेळापत्रकानुसार या परीक्षा येत्या १ डिसेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत घेण्यात येणार होत्या; मात्र आता या परीक्षा ९ डिसेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती परीक्षा परिषदेने दिली.
संगणक टंकलेखन परीक्षेसाठी राज्यभरातून एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षा परिषदेने मॅन्युअल टायपिंग आणि लघुलेखन परीक्षेसाठीचे वेळापत्रक अद्याप जाहीर केलेले नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत अधिकृत वेळापत्रक प्रसिद्ध केले जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांत मॅन्युअल टायपिंग परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे.
तर, संगणक टंकलेखन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. परीक्षेतील गैखकार रोखण्यासाठी परीक्षा परिषदेकडून अनेक बदलही करण्यात आले आहेत. परिषदेतर्फे जूनमध्ये घेण्यात आलेल्या टंकलेखन, लघुलेखन परीक्षांमध्ये अनेक तांत्रिक अडचणी आल्या होत्या. त्यामुळे वेळापत्रकात बदल केला होता.