⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | बातम्या | सोयाबीन खरेदीबाबत मुख्यमंत्री शिंदेंचं दिलासादायक आश्वासन; वाचा काय म्हणाले

सोयाबीन खरेदीबाबत मुख्यमंत्री शिंदेंचं दिलासादायक आश्वासन; वाचा काय म्हणाले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार सभा आज सायंकाळी सहा वाजेनंतर थंडावणार आहे. यांनतर मतदानाकडे लक्ष लागले आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष शेतकऱ्यांना लाभ देण्याच्या घोषणा देत आहेत.मात्र कापसाचे भाव किमान आधारभूत किमतीच्या खाली घसरल्याने आणि सोयाबीनला योग्य भाव न मिळाल्याचा मुद्दा महाराष्ट्रात चांगलाच तापला आहे. राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी भावामुळे चिंतेत आहेत, त्यांना योग्य भाव मिळत नाही. तर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना पिकांची विक्री करता येत नाही. यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उघडपणे बोलले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज तकला दिलेल्या मुलाखतीमध्ये, आम्ही शेतकऱ्यांकडून 15 टक्के ओलावा असलेले सोयाबीन देखील खरेदी करत आहोत. शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीत सोयाबीनची खरेदी करण्यात येईल. शेतकऱ्यांचा संपूर्ण सोयाबीन खरेदी करण्यासाठी लागणारी सर्व केंद्रे उघडली जातील. आमचे एकमेव सरकार आहे जे शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विम्याची सुविधा देत आहे. आम्ही शेतकऱ्यांना दरवर्षी 12 हजार रुपये रोख देत आहोत. असेही शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आमचे सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आहे. आमचे सरकार हे पहिले सरकार आहे जे शेतकऱ्यांसाठी 1 रुपये दराने पीक विमा सुविधा देत आहे. विद्युत पंप वापरून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे वीज बिल आम्ही माफ केले आहे. ज्या शेतकऱ्यांना गरज आहे त्यांना सौरपंप दिले जात आहेत. शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपये देणारे हे पहिले सरकार आहे. पीएम पीक विमा योजनेंतर्गत 6,000 रुपये केंद्र आणि उर्वरित 6,000 रुपये राज्य सरकार देते.

एकनाथ शिंदे म्हणाले की, नाफेड ही केंद्रीय संस्था शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किंमत म्हणजेच 4892 रुपये एमएसपीवर सोयाबीन खरेदी करत आहे. शेतकऱ्यांचा संपूर्ण सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे. 15 टक्के ओलावा असतानाही नाफेड शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. खरेदीसाठी आवश्यक तेवढी केंद्रे उघडली जातील. सर्व शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल. आता केंद्र सुरू करण्याची गरज भासल्यास ते सुरू करण्यात येईल. असे आश्वासनही एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.