⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | बातम्या | ‘स्वावलंबी महिला’ : लाडकी बहिण योजनेच्या पैशांमधून महिलांनी सुरु केले स्वत:चे व्यवसाय

‘स्वावलंबी महिला’ : लाडकी बहिण योजनेच्या पैशांमधून महिलांनी सुरु केले स्वत:चे व्यवसाय

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । महिला सक्षमीकरणाची चर्चा नेहमीच होते. मात्र खऱ्या अर्थाने महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचं मोठं पाऊल महाराष्ट्रातील महायुती सरकारने उचललं आहे. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेमुळे महिलांना आर्थिक मदत मिळाल्यामुळे त्यांच्या घरखर्चाला हातभार तर लागलाच आहे मात्र या योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांनी स्वत:चे छोटे-मोठे व्यवसाय सुरु केले आहेत. या योजनेचे पैसे चांगल्या कारणासाठी वापरल्याची अनेक उदाहरणे आहेत त्यात एक सांगायचे झाल्यास या योजनेच्या माध्यमातून कित्येक गृहीणींना उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण झाला. यामुळे त्या खऱ्या अर्थाने स्वावलंबी झाल्या आहेत. हेच या योजनेचे मोठे यश म्हणावे लागेल.

महायुती सरकारने महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी राज्यात लाडकी बहिण योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार असा आर्थिक लाभ दिला जात आहे. ही योजना गाव खेड्यापर्यंत पोहचली असून या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलांना आतापर्यंत साडे सात हजार रुपयांचा लाभ मिळाला आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना मिळणाऱ्या पैशांमुळे अनेक महिलांच्या संसाराला मदतीचा हात मिळाला आहे. आता त्यांना पैशांसाठी कुणावर अवलंबून राहावे लागत नाही. याच पैशांमधून काही महिलांनी स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याचे धाडस केले असून यात त्या यशस्वी देखील झाल्या असल्याची अनेक उदाहरणे आहेत.

दुप्पट फायद कमविला
एका महिलेने या योजनेतून मिळणाऱ्या पैशांची गुंतवणूक स्वतःच्या कपड्याच्या व्यवसायात केली. साडे सात हजारांची गुंतवणूक करुन या महिलेने 15 हजारांचा नफा कमावला. याबद्दल बोलतांना त्या म्हणाल्या की, “माझे स्वतःचे आदित्य क्लॉथ सेंटर आहे. तिथे मी कपड्यांचा व्यवसाय करते. त्या व्यवसायात मी माझी काही रक्कम आणि लाडकी बहिण योजनेतून जे काही पैसे मला मिळाले ते गुंतवले. याद्वारे मी साडेसात हजारांचे 15 हजार रुपये म्हणजेच दुप्पट रक्कम केली आहे असे या महिलेने सांगितले.”

“मी आज महायुती सरकारला खरोखर धन्यवाद देऊ ईच्छिते की, आपण सरकार म्हणून जो पर्याय आम्हा बहि‍णींना दिला म्हणजेच जी रक्कम सरकारने दिली त्याने मला फायदा झाला. यापुढेही असेच आपण महायुती सरकार म्हणून लाडक्या बहि‍णींसाठी असेच काही चांगले प्रयत्न आपण करावे.”, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.

इस्त्री काम करणाऱ्या महिलेने लाडकी बहिण योजनेच्या पैशातून इस्त्री खरेदी केली आणि स्वतःच्या व्यवसायाला सुरुवात केली. यासंदर्भात संबंधित महिलेने सांगितले की, “लाडकी बहिण योजनेतून मी इस्त्री घेतली. ही योजना अशीच पुढे सुरु ठेवावी, लाडक्या भावांकडून आम्हाला अजून काय हवे.” अशी मार्मिक प्रतिक्रीया या महिलेने दिली.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.