⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | तरसोद-भादली परिसरात गुलाबराव पाटील यांचे रेकॉर्ड ब्रेक स्वागत; ग्रामस्थांनी जेसीबी वरून उधळली फुले

तरसोद-भादली परिसरात गुलाबराव पाटील यांचे रेकॉर्ड ब्रेक स्वागत; ग्रामस्थांनी जेसीबी वरून उधळली फुले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२४ । शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी कडगाव, जळगाव खुर्द, खिर्डी, निमगाव, बेळी, मन्यारखेडा, तरसोद आणि भादली या परिसरातील शेतकऱ्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी ऐतिहासिक महत्त्वाकांक्षी बंदिस्त पाईपलाईन योजना राबवून थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवले. यामुळे या भागातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी कायमस्वरूपी पाण्याची सुविधा मिळत असून शेळगाव पूल, कडगाव पूल, तरसोद गणपती मंदिराला पर्यटन दर्जा देऊन कोटींचा निधी, हायवे (मकरा पार्क) ते तरसोद रस्त्याला दर्जा देऊन तीन कोटींचा निधी मंजूर केला. मन्यारखेडा ते हायवेपर्यंत दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. विविध मुलभूत सुविधा आणि सिंचनाच्या बंधाऱ्यांसारख्या पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा केल्याने जनतेचा भक्कम साथ व पाठिंबा मिळत असल्याचे गुलाबराव पाटील यांनी प्रचारा दरम्यान शेतकरी जनतेशी संवाद साधताना सांगितले. प्रचार रॅलीमध्ये तरसोद – भादली परिसरात तुफान गर्दीत गुलाबभाऊंचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
प्रचार रॅलीत पायाला भिंगरी लावून माजी महापौर ललितभाऊ कोल्हे, जि.प. चे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी सभापती जितेंद्र नारखेडे, भाजपाचे चंद्रशेखर अत्तरदे, तुषार महाजन, सेनेचे संजय पाटील सर, राजेंद्र पाटील, तालुका प्रमुख शिवराज पाटील, भाजपचे तालुका अध्यक्ष हर्शल चौधरी, मिलिंद चौधरी, संजय भोळे, दुध संघाचे रमेशआप्पा पाटील, राजेंद्र चव्हाण, तरसोद – सुदाम राजपूत, सरपंचपती निलेश पाटील, पद्माकर बराटे अरुण बराटे मनोज काळे योगेश, बऱ्हाटे संतोष देवरे, किरण ठाकरे, शाखाप्रमुख दिगंबर धनगर, रवींद्र थोरात , विकास कुंभार, मंगल राजपूत, हर्षल नारखेडे , जितेंद्र नारखेडे, भुषण पाटील, संदीप कोळी, सरपंच गणेश पाटील, गावकरी भाऊ, चेतन पाटी,ल राजेश पाटील, योगेश कोळी ,नंदू कोळी, जळगाव खुर्द- कुंदन पाटील, भगवान महाजन, प्रमोद पाटील, निमगाव सरपंच अक्षय पाटील, शोभाताई धनगर, युवराज पाटील, सोपान पाटील, कृष्णा पाटील, मन्यारखेडा – भरतसिंग पाटील, राजूभाऊ पाटील, पिंटू पाटील, नामदेव पाटील, नाना पाटील, मुन्ना पाटील, अनिल नारखेडे, सोपान कोल्हे, छोटू पाटी,ल अरुण सपकाळे, सुनील बाविस्क,बेळी – सरपंच तुषार चौधरी, संजय नाले, मेघा नाले, जयश्री चौधरी, रत्‍नाबाई इंगळे, संजय शिरोडे, शरद राणे, यांच्यासह या परिसरातील महिलांसह महायुतीचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होवून ‘धनुष्यबाणाला’ प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन करीत होते.

सोमवारचा (दि ११) प्रचार दौरा
धरणगाव तालुक्यातील निशाने बु. – स.8, पिंपळे बु. – स. 9, पिंपळे खु.- 10, गोंदेगाव – स. 11, साळवा – दुपारी 4.30, नांदेड – सायं. 6, साकरे – – 7.30, कंडारी – रात्री 8.00 वाजता

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.