जळगाव लाईव्ह न्यूज । १ नोव्हेंबर २०२४ । ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. UPI Lite चा वापर करणाऱ्यांसाठी दिवाळीच्या दिवशीच एक गोड बातमी मिळणार आहे. येत्या १ नोव्हेंबरपासून UPI Lite मध्ये २ मोठे बदल केले जाणार आहे. आता UPI Lite वर जास्तीचा पेमेंट करता येणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) UPI Lite त्या पेमेंटची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
पहिला बदल हा सर्वांसाठीच अतिशय महत्वाचा आहे. कारण पेमेंटची मर्यादा वाढवण्यात आली आहे. तर दुसरा आणि महत्वाचा बदल म्हणजे, जर तुमच्या UPI Lite चा बॅलेंस संपला,तर टॉप अप फिचरमुळे UPI Lite मध्ये पुन्हा पैसै अॅड होतील. त्यामुळे पेमेंट करताना कुठलाही अडथळा येणार नाही.
केव्हापासून सुरु होणार नवीन फिचर?
UPI Liteचा ऑटो टॉपअपचा फिचर येत्या १ नोव्हेंबर २०२४ पासून सुरु होणार आहे. या फिचरमुळे तुमचा पेमेंट कधीच थांबणार नाही. छोटे – मोठे पेमेंट करण्यासाठी UPI Liteचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र दरवेळी तुम्हाला बॅलेंस अॅड करण्यासाठी रिचार्ज करावा लागतो. मात्र आता ही कटकट मिटणार आहे. कारण रिचार्च न करता पैसे ऑटो डेबिट होऊन तुम्ही UPI Lite फिचरचा वापर करु शकतो.ऑटो टॉप अप कसा करता येणार?
तुम्हाला UPI Lite चा कमीत कमी बॅलेंस सेट करता येणार आहे. या फिचरनुसार, तुमचा बॅलेंस सेट केलेल्या रकमेपेक्षा कमी झाल्यास, टॉप अप फिचरमुळे लिंक असलेल्या अकाऊंटमधून आपोआप पैसे अॅड होतील. ही रक्कम तुम्हाला सेट करता येणार नाही. या वॉलेटची मर्यादा २००० रुपयांपेक्षा जास्त नसणार आहे. यासह एका दिवसात पाच वेळेस टॉपअप रिचार्ज करता येईल.