ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव तालुक्यातील ठाकरे गटाचे तालुका समन्वयक विजय लाड आणि युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील, शरद पवार गटाचे नामदेव पाटील यांच्यासह चिंचोली, धानवड व शिरसोली येथील एकता मंडळ व भोलेनाथ मित्र मंडळ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. हा प्रवेश शिवसेनेचे नेते ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
या वेळी गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, महायुतीचे सरकार राज्यात पुन्हा येऊन स्थैर्य आणि विकास येणार असून ‘बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारधारेचा भगवा पुन्हा फडफडणार असल्याचा ठाम विश्वास आहे. ‘सोबत काम केलेले जुने सवंगडी आपल्यासोबत आल्याने मनस्वी आनंद असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. यांनी केला शिवसेनेत प्रवेश उबाठाचे जळगाव तालुक्याचे समन्वयक विजय लाड, युवा सेनेचे उप जिल्हाप्रमुख अविनाश पाटील, शरद पवार रा.कॉ. चे नामदेव पाटील, शिरसोली येथील एकता मंडळ अध्यक्ष विनोद मिल व सर्व सदस्य व भोलेनाथ मित्र मंडळ अध्यक्ष दीपक पाटील, भरत पाटील व सर्व सदस्य यांच्यासह चिंचोली येथील महेश सानप, मनोज शेळके, पप्पू पालवे, योगेश वाघ, भूषण पाटील, ज्ञानेश्वर दहातोंडे, संतोष लाड, संदीप पठार, सुनील बागले, दगडू वाघ, लोटन घुगे नामदेव सानप तर धानवड येथील नितीन पाटील, अतुल पाटील या उबाठाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
घर वापसी झाल्याचे समाधान हिंदुत्वाचे खरे कैवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गुलाबभाऊ हे असून आम्ही आपल्या हक्काच्या घरट्यात म्हणजे शिंदे यांच्या नेतृत्वात व गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने शिवसेनेते परतल्याचे समाधान या वेळी शिवसेनेत प्रवेश केलेले विजय लाड यांनी व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, तालुकाप्रमुख शिवराज पाटील, माजी सभापती नंदलाल पाटील, शेनफडू पाटील, विजय पाटील, अनिल पाटील, शेतकी संघाचे संचालक ब्रिजलाल पाटील, सरपंच संभाजी पवार, मनोज चौधरी, अतुल घुगे, केतन पोळ, नाना हवालदार व जितेंद्र पोळ यांच्यासह पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.