जळगाव लाईव्ह न्यूज । काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आरक्षण विरोधात केलेल्या कथित वक्त्व्यावरुन देशभरात मोठं वादळ उठलं आहे. काँग्रेस आरक्षण रद्द करेल, अशी भुमिका राहुल यांनी मांडल्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. राहुल यांच्या भुमिकेला विरोध करण्याऐवजी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही राहुल गांधी यांच्या भुमिकेचे उघडपणे समर्थन केल्याने एससी, एसटी आणि ओबीसी समुदायांमध्ये नाराजी पसरली आहे. काँग्रेसच्या आरक्षण विरोधी या भुमिकेचा भाजपाने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
अमेरिका दौऱ्यात राहुल गांधी यांनी जॉर्जटाऊन विद्यापीठातील एका विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना, भारत सर्वांसाठी समान देश होईल तेव्हाच आम्ही आरक्षण संपवण्याचा विचार करू, असे म्हटले होते. राहुल गांधी यांनी देशातील आरक्षणाबाबत परदेशात केलेल्या विधानावरून राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत भाजपाने राज्यात आंदोलन केले. तसेच राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली.
भारताच्या स्वातंत्र्यापासून काँग्रेस पक्षाने संविधान आणि त्याचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भुमिकेचा विरोधच केला आहे. काश्मीर आणि उर्वरित भारतासाठी दोन स्वतंत्र संविधान लागू करून आंबेडकरांच्या घटनात्मक तरतुदींची पूर्णपणे अंमलबजावणी न केल्याचा काँग्रेसवर नेहमीच आरोप होत असतो. काही दिवसांपूर्वी काँग्रेसनेते सॅम पित्रोदा यांच्या अशाच एका वक्त्यावरुन मोठा गदारोळ झाला होता. भाजप संविधान संपविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत प्रचार यंत्रणा राबवली मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. काँग्रेसच ही चाल त्यांच्यावरच बुमरँग झाल्याचे निकलानंतर दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने या समुदायांमधील नॉन-क्रिमी लेयरसाठी आरक्षण कायम ठेवले आहे आणि त्याचा विस्तारही केला आहे.
दलित समाजावर परिणाम :
संविधानाचे रक्षण करण्याचा दावा करत असतानाही काँग्रेसवर दलितांपेक्षा मुस्लिम समाजाच्या हिताला प्राधान्य दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. भारताच्या साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क आहे, असे एका सर्वोच्च काँग्रेस नेत्याच्या विधानाने अधोरेखित केले. काँग्रेसच्या आरक्षणविरोधी भूमिकेवरून निर्माण झालेल्या वादामुळे या समुदायांनी आगामी निवडणुकांमध्ये आरक्षणाबाबत काँग्रेसच्या भूमिकेचा विचार करण्याचा इशारा दिला आहे.
भाजपाचे आरक्षणाला पूर्ण समर्थन :
लोकसभा निवडणुकीवेळी भाजपा आरक्षण रद्द करणार, असे आरोप करत काँग्रेसनं लोकांना भूलथापा देऊन त्यांची मनं वळवण्याचा प्रयत्न केला. परंतु आज त्यांच्या पोटातलं त्यांच्या ओठात आलेलं आहे. आपल्या देशाची गरिमा देशाच्या बाहेर गेलेल्या प्रत्येक जाती-धर्माच्या माणसानं ठेवली पाहिजे. देशाची गरिमा खराब करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. संविधानाचा अवमान त्यांनी करायला नको होता. याबाबत त्यांनी खुलासा करायला पाहिजे. सोबत त्यांच्या मित्र पक्षांनीही राहुल गांधींच्या भूमिकेशी ते सहमत आहेत का? याबाबत सुद्धा खुलासा केला पाहिजे,” असा हल्लाबोल भाजपाने केला आहे. काँग्रेस आरक्षण हटविण्याची भाषा करत असला तरी आरक्षण राखून आणि वाढवून वंचित वर्गाला पाठिंबा देण्याची आमची भुमिका असल्याचे भाजपाचे म्हणणे आहे.