गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये आंतरराष्ट्रीय बालिका दिवस उत्साहात
भविष्यासाठी मुलीची दृष्टीवर मंथन
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२४ । जळगाव येथील गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग मध्ये नुकताच आंतरराष्ट्रीय बालिका दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. भविष्यासाठी मुलींची दुष्टी या वर्षीची थिम असून यावर विचारवंतांनी मार्गदर्शन केले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य विशाखा गणविर, स्त्रीरोग विभाग प्रमुख मिनाव देवी, प्रा निम्मी वर्गीस,प्रा.जयश्री जाधव,प्रा स्नेहल जांभोळकर इ उपस्थीत होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. भविष्यासाठी मुलीची दृष्टी या विषयावर आधारीत पोस्टरचे अनावरण करण्यात आले. २०२४ च्या आंतरराष्ट्रीय बालिका दिनाची थीम गर्ल्स व्हिजन फॉर द फ्युचर आहे. युनिसेफने केलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की मुली, अनेक आव्हानांना तोंड देत असूनही, एक चांगले भविष्य घडवण्यासाठी आशावादी आणि दृढनिश्चयी राहतात.
दररोज, जगभरातील मुली एका दृष्टीच्या दिशेने काम करत आहेत ज्यामध्ये त्यांना संरक्षित, आदर आणि सशक्त केले जाते. जेव्हा मुलींना योग्य संसाधने आणि संधींचे समर्थन केले जाते, तेव्हा त्यांची क्षमता अमर्याद असते. आणि जेव्हा ते नेतृत्व करतात तेव्हा सकारात्मक प्रभाव त्यांच्या कुटुंबावर, समुदायांवर आणि अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचतो असे प्रा मिनावदेवी यांनी सांगितले यांनिमीत्ताने घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.जी एन एम व बीएस्सी नर्सिगच्या १९ स्पर्धकांनी सहभाग घेतला.
यात प्रथम विजेता लोकेश्वरी सोनार जीएन एम प्रथमवर्ष, व्दीतीय सानिका महल्ले बी एस्सी चतुर्थ सत्र आणि तृतीय रूचिता वंजारी जीएन एम प्रथम वर्ष परिक्षक म्हणून प्रा हेमांगी मुरकुटे, प्रा. समृध्दी चव्हाण यांनी काम पाहीले,या निमीत्ताने भविष्यासाठी मुलीची दृष्टीवर नाटीका देखिल प्रस्तुत करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रा. वैष्णवी शहाणे यांनी केले यशस्वीतेसाठी स्त्रीरोग विभागाच्या प्राध्यापक, कर्मचा—यांनी परिश्रम घेतले.