जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२४ । माजी राष्ट्रपती डॉ. ए पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमीत्त वाचन प्रेरणा दिवस” हा साजरा करण्यात येतो. याच निमीत्त डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयात ग्रंथालयाच्या वतीने चर्चासत्र आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड किर्ती पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून अॅड डॉ. नयना महाजन या उपस्थीत होत्या.मान्यवरांनी यावेळी डॉ. ए पी जे कलाम यांचा जिवनपट चित्रफितीच्या माध्यमातून उलगडून सांगत डॉ. ए पी जे कलाम यांच्या व्यक्तीमत्वातून खुप काही शिकण्यासारखे असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.अनुजा पाटील तर आभार डॉ. ललीता सपकाळे यांनी मानले यशस्वीतेसाठी ग्रंथपाल प्रा. इश्वर राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विधी महाविद्यालयाचे विदयार्थी उपस्थीत होते.