⁠ 
शनिवार, डिसेंबर 21, 2024
Home | जळगाव जिल्हा | शैक्षणिक साहित्यांची भेट देऊन कन्या सन्मान; डॉ. केतकीताई पाटील यांची संकल्पना

शैक्षणिक साहित्यांची भेट देऊन कन्या सन्मान; डॉ. केतकीताई पाटील यांची संकल्पना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरात राबविला स्तुत्य उपक्रम

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२४ । जळगाव शहरात आज डॉ.केतकी ताई पाटील यांच्या संकल्पनेतून आणि बाल भीम व्यायाम शाळा मित्र मंडळ,आंबेडकर नगर, जुने जळगाव यांच्या सहकार्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरात कन्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मुलींना शिक्षणाबद्दल आवड निर्माण व्हावी. त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे याकरिता वह्यांचे वाटप करण्यात आले. याशिवाय आरोग्य सुदृढ राहावे यासाठी शाळेत जाताना नियमित डब्बा न्यावा असे आवाहन करून जेवणाचा डब्बाही भेट दिला.

या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ.केतकी ताई पाटील, भाजपा महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई वर्मा, भाजपा महिला मोर्चा महानगर प्रमुख भारतीताई सोनवणे ,माजी महापौर सीमाताई भोळे, नंदाताई सोनवणे, खुशबू ताई बनसोडे, जिजाबाई सोनवणे, ज्योती सोनवणे, कविता सोनवणे, सोनाली सोनवणे ह्या उपस्थित होत्या. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध, रमाई आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांना पुष्पहार अर्पण करून कन्या सन्मानास सुरुवात झाली.

या प्रसंगी मान्यवरांनी उपस्थित कन्यांचे पाय धुवून त्यांना मिष्टान्न देऊन तसेच टिफीन, प्रत्येकी ५ वही, नेलपॉलिश, टिकली आदी साहित्य वितरित करण्यात आले. भेटवस्तू मिळाल्याचा आनंद मुलींच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. तसेच परिसरातील नागरिकांमधूनही या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले. या वेळी धीरज वर्मा, प्रकाश सोनवणे, मयूर सोनवणे, कमलाकर बनसोडे, किरण सोनवणे, मोहित बनसोडे ,राहुल सोनवणे, सचिन सोनवणे, शरद सपकाळे आदी उपस्थित होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.