⁠ 
रविवार, जानेवारी 5, 2025
Home | जळगाव जिल्हा | गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

देशातील मान्यवरांची गोदावरीत मांदियाळी

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२४ । गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे ब्रिजिंग द गॅप: नाविन्यपूर्ण नर्सिंग शिक्षणातील सुधारणा आणि क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये उत्कृष्टता या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन ११ आणि १२ ऑक्टोबर रोजी करण्यात येत आहे. यासाठी दोन दिवस देशातील मान्यवरांची गोदावरीत उपस्थीती राहणार आहे.

या परिषदेचे उद्दिष्ट नर्सिंग शिक्षण आणि क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये सुधारणा करण्यासाठी नवीन दृष्टिकोन आणि अनुभवांची देवाणघेवाण करणे आहे. नर्सिंग शिक्षणात नाविन्यपूर्ण बदल घडवण्याचे ध्येय ठेऊन या परिषदेच्या आयोजनासाठी प्राचार्य विशाखा गणवीर आणि महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने विशेष प्रयत्न केले असून हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.परिषदेत देशभरातील नर्सिंग क्षेत्रातील नामांकित आणि प्रतिष्ठित वक्त्यांची उपस्थिती आहे, ज्यांनी नर्सिंग आणि आरोग्य क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे.

पुढील मान्यवर व्यक्तींचा समावेश :
डॉ. आय. क्लेमेंट,डॉ. लॅरिसा मातरा,डॉ. जमुना राणी,डॉ. रीटा लखानी,डॉ. रवींद्र एच. एन,डॉ. नेसा सत्या,डॉ. मोहम्मद हुसेन इ मान्यवर नाविन्यपूर्ण नर्सिंग शिक्षणाच्या पद्धतींवर मार्गदर्शन करतील आणि क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये कसे सुधार करता येईल यावर विचार मांडतील. या सत्रांमध्ये नर्सिंग शिक्षणातील नवीन पद्धती, तंत्रज्ञानाचा वापर आणि सैद्धांतिक व प्रायोगिक प्रशिक्षणामधील अंतर कमी करण्याबाबत चर्चा केली जाईल. परिषदेच्या दुसर्‍या दिवशी एक महत्त्वपूर्ण पॅनेल चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यात नर्सिंग शिक्षणाच्या आव्हानांवर आणि भारतातील भविष्यातील दिशांवर चर्चा होईल. या पॅनेलमध्ये सहभागी होणारे पॅनेलिस्ट पुढीलप्रमाणे डॉ. अन्सी रमेश,डॉ. मिलिंद काळे,डॉ. विश्वनाथ बिरादार,डॉ. शिवचरन सिंग ही पॅनेल चर्चा प्रा. स्वप्नील रहाणे यांच्या संयोजनाखाली होणार असून, ही चर्चा अत्यंत प्रेरणादायक आणि ज्ञानवर्धक होण्याची अपेक्षा आहे. प्राचार्य विशाखा गणवीर आणि महाविद्यालयाचे व्यवस्थापन यांच्या नेतृत्वात गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगने या परिषदेच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण नर्सिंग शिक्षणाला चालना देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. राष्ट्रीय पातळीवरील हा परिषद देशभरातील नर्सिंग व्यावसायिक, शिक्षक, आणि विद्यार्थी यांना आकर्षित करेल अशी अपेक्षा आहे.

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग विषयी:
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग हा एक अग्रगण्य शिक्षण संस्था आहे, जो जागतिक दर्जाचे नर्सिंग शिक्षण प्रदान करण्यास समर्पित आहे. उत्कृष्ट शैक्षणिक दर्जा आणि प्रायोगिक प्रशिक्षणावर भर देत, हा महाविद्यालय अनेक नर्सिंग व्यावसायिकांच्या कारकिर्दीला आकार देत आहे, जे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आरोग्यसेवेत मोलाचे योगदान देत आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.