जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२४ । सोशल मीडियामुळे कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल, हे काही सांगता येत नाही. गटारीच्या पाण्याने पालेभाज्या धुतानाचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेत असतील. पण जळगाव महापालिकेमधील एका धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ज्यात जळगावच्या महापालिकेमध्ये प्रसाधन तसेच शौचालय गृहातील बेसिंगमध्ये चहाचे कप धुतले जात असले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगात व्हायरल होत असून महापालिकेतील या प्रकाराबद्दल तसेच कारभाराबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात असून स्वच्छतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
काय आहेत प्रकार?
सध्या जळगावच्या महापालिकमधील घाण पाण्यात कपबशा धुतल्या जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. जिथे प्रसाधनगृहामध्ये शौचालय सुद्धा असून या ठिकाणी असलेल्या बेसिंग मध्ये शिपाई कडून कप धुतले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे हेच कप आयुक्ताच्या दालनात कार्यालयातील मान्यवरांसाठी वापरण्यात येत असतात.दरम्यान, हा व्हिडिओ एका व्यक्तीने मोबाईमध्ये कैद करुन सोशल मीडियावर व्हायरल केलेला आहे.
दरम्यान महापालिकेतील या प्रकाराबद्दल तसेच कारभाराबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात असून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सोशल मीडियावर यापूर्वीही गटारीच्या पाण्याने पालेभाज्या धुतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहे. शिवाय असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.