डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या डॉक्टरांची कमाल
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२४ । आरोग्य शिबिरातून आजारावर उपचाराची दिशा गवसलेल्या ११ वर्षीय बालिकेच्या हृदयावरील छीद्रावर यशस्वी शस्रक्रिया करुन एका लहानग्याला जीवनदान देणारे डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या हदयरोग डॉक्टरांनी कमाल केली.
लहान मुलांच्या ह्रदयावर शस्त्रक्रिया करणे अत्यंत कठीण काम असते, कारण अशावेळी त्यांच्या जीवाला जास्त धोका असतो, मात्र एका लहानग्यासाठी डॉक्टरांनी देवदूतासारखी भूमिका निभावत ही किमया करून दाखवली आहे. आरोग्य शिबिरातून गवसलेल्या या ११ वर्षीय बालिकेच्या हृदयावरील छीद्रावर यशस्वी शस्रक्रिया करुन लहानग्याला जीवनदान देणारे डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या कॉर्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. वैभव पाटील, डॉ. हार्दिक मोरे, डॉ.मोहीत, डॉ. ललीत, डॉ.निखील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
बाळाच्या हृदयाला होते २४ मि.मि.चे छिद्र
जामनेर तालुक्यातील भारूडखेडे येथील रहिवाशी मनोज गोसावी यांच्या ११ वर्षीय बालिकेला श्वास घेण्यास त्रास आणि पुरेशी झोप येत नसल्याचे निदर्शनास आले, त्यानंतर त्यांनी जामनेरात व इतर ठीकाणी या मुलीच्या चाचण्या केल्या त्यावेळी या बालिकेच्या हृदयाला २४ मि.मि. आकाराचे छिद्र असल्याचे निदर्शनास आले. हृदयाचा आकार लहान असल्यामुळे शस्त्रक्रिया करण्यास अडचण असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च देखिल सांगण्यात आला. आर्थीक विवंचनेत असतांना त्यांनी डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय रुग्णालयात डॉ हार्दिक मोरे यांचेशी संपर्क साधाला. त्यांनी बालीकेला दाखल करण्यास सांगितले व ट्रान्सकॅथेटर प्रक्रिया राबवून ही यशस्वी शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत केली. शस्त्रक्रियेनंतर बाळाच्या प्रकृतीत सुधारणा होत असून बाळाचा आहार आणि झोप व्यवस्थित होत असल्याचे दिसून आले आहे.