जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव येथील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रशिक्षण व प्लेसमेंट कौशल्येवर संगणक अभियांत्रिकी विभागाने उज्ज्वल करिअर संधींसाठी प्रशिक्षण आणि प्लेसमेंट कौशल्ये वृद्धिंगत करणे: या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित केले. आयुक्युएसी आणि माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेच्या सहकार्याने झालेल्या या सत्रात विद्यार्थ्यांना तज्ज्ञांचे अनुभव कथन व मार्गदर्शन मिळाले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक २०१० बॅचचे माजी विद्यार्थी श्री. आकाश शेलार (एचडीएफसी असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट), महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रा. निलेश वाणी (संगणक विभाग प्रमुख), डॉ. विजयकुमार वानखेडे, (प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी) प्रा. किशोर महाजन (ल्युमिनी असोसिएशन), सर्व प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.आलेल्या मान्यवरांचे डॉ. विजयकुमार पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.कार्यक्रमाची सुरुवातीला प्रा. वेलचंद होले यांनी प्रास्ताविकात,प्लेसमेंटसाठी विभागाच्या पुढील योजना मांडल्या. विभागप्रमुख प्रा. निलेश वाणी यांनी उपक्रमांचे सविस्तर वर्णन करत विद्यार्थ्यांच्या यशस्वी प्लेसमेंटसाठी होणार्या प्रयत्नांवर भर दिला.
आकाश शेलार यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना सॉफ्ट स्किल्स, संवाद कौशल्य, नेतृत्वगुण आणि परिस्थितीनुसार जुळवून घेण्याच्या क्षमतेच्या महत्त्वावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना यशस्वी करिअरसाठी या कौशल्यांची कशी आवश्यकता आहे, याबद्दल सखोल माहिती दिली. विद्यार्थी तसेच असतानाच सर्व गुणवैशिष्ट्ये आत्मसात करण्याबद्दल आवाहन केले जेणेकरून बाहेरील जगात वावरताना या सर्व गोष्टींचा फायदा तुम्हाला होईल.डॉ. विजयकुमार वानखेडे, (प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी), यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या करिअरच्या आकांक्षा व अपेक्षा जाणून घेतल्या आणि त्यांना योग्य मार्गदर्शन दिले.
शेवटी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक संधीचा फायदा घ्यावा असे प्रोत्साहित केले व आयोजनाबद्दल कौतुक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वितीय वर्षातील संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनी डिंकी शादानी आणि हेमांगी बावा यांनी केले, आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील (सचिव), डॉ.केतकी पाटील(सदस्य) व डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजी) यांनी कौतुक केले.