⁠ 
रविवार, ऑक्टोबर 6, 2024
Home | जळगाव जिल्हा | योगेश चौधरी यांनी कॉम्पुटर सायन्समध्ये पीएचडी मिळविली

योगेश चौधरी यांनी कॉम्पुटर सायन्समध्ये पीएचडी मिळविली

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । खानदेश कॉलेज एजुकेशन सोसायटी चे इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च येथील योगेश नारायण चौधरी यांनी कॉम्पुटर सायन्स (सायन्स अंड टेक्नोलोजी) मध्ये नुकतीच पीएचडी पूर्ण केली आहे. त्यांनी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे पीएचडीसाठी नोंदणी केली होती. प्रा. डॉ. बी एच बर्हाटे. (व्हॉइस प्रिंसिपल भुसावळ आर्ट्स सायन्स पी ओ नाहाटा कॉमर्स कॉलेज) भुसावळ यांच्या मार्गदर्शनाखाली चौधरी यांनी पीएचडी पूर्ण केली.

त्यांनी ‘इफेक्टिव टेक्स्ट स्टेगनोग्राफीक मेकॅनिझम युझिंग न्यूमरिकल एनकोडिंग’ (माहिती सुरक्षितता) या विषयावर शोधनिबंध सादर केला आहे. त्याचे पीएचडी कार्य माहिती सुरक्षित पद्धतीने देवान घेवान करण्यासाठी उपयुक्त राहील. माहिती सुरक्षितता (इन्फॉर्मेशन हायडिंग) हे आता सध्याच्या युगात खूप डिमांड असलेले क्षेत्र असल्यामुळे या शोधनिबंधा मध्ये सादर केलेल्या पध्दतीने आपला मेसेज (इंग्लिश टेक्स्ट कम्युनिकेशन) हे शॉर्ट मेसेजिंग सर्व्हिसेस (एसएमएस) स्वरुपात मोबाईल टू मोबाईल सुरक्षित पद्धतीने पाठवता येईल, यामुळे माहिती देवाण घेवाण करण्यारया व्यक्ती व्यतिरिक्त हा मेसेज कोणीही वाचू शकणार नाही.

चौधरी यांना पीएचडी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. व्ही एल माहेश्वरी यांच्या हस्ते देण्यात आली. योगेश चौधरी यांना केसीई संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत श्री नंदकुमार बेंडाळे यांचे मार्गदर्शन लाभले.आणि इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चचे संचालक प्रोफेसर बी व्ही पवार, तशेच माजी संचालक प्रोफेसर शिल्पा बेंडाळे यांचे ही मार्गदर्शन लाभले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.