जळगाव लाईव्ह न्यूज| मुक्ताईनगर तालुक्यातील काही रस्त्यांवर मोठ-मोठे जीवघेणे खड्डे पडून रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. तालुक्यातील पुर्नाड फाटा ते डोलारखेडा फाटा दरम्यान रस्ता खराब झाला असून रस्त्याच्या दुतर्फा मोठमोठी काटेरी झूडपे वाढली आहे. आधीच खड्डेमय रस्ता त्यात साईड ने काटेरी झुडपे यामुळे वाहधारक कामालीचे त्रस्त असून वैतागलेले आहे.मोठ्या खड्ड्यामुळे राशा बरड जवळ वळणदार घाटात अनेक वाहने नादुरुस्त होत आहे.
तसेच अवजड वाहने वेग मंदावल्या मुळे चढत नाही.परिणामी छोट्या वाहनांचे अपघात होण्याची संभावांना आहे.या रस्त्यावर आतापर्यंत अनेक किरकोळ व गंभीर स्वरूपाचे अपघात होऊन जीवितहानी झालेली असून हा रस्ता म्हणजे अपघाती मार्ग अशी ओळख निर्माण झालेली आहे. तसेच मुक्ताईनगर स्मशानभूमी ते घोडसगाव हा रस्ताही शेवटची घटका मोजतो आहेत.गेल्या दोन-तीन महिन्यांपासून या रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे अनेक सुज्ञ नागरिकांनी तक्रारी सुद्धा केल्या यमुळं पावसाळ्याचं कारण सांगत तात्पुरती डागडुजी म्हणून सदर रस्त्यावर माती मिश्रित खरवं टाकण्यात आलं.
परिणामी वाहनधारकांना उडणाऱ्या धुळीचा त्रास सोसावा लागला.असतांना मात्र सर्वजनिक बांधकाम विभागाचे या प्रकारकडे सर्रास पणे दुर्लक्ष केले जात आहे.