⁠ 
गुरूवार, ऑक्टोबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | Ladki Bahin Yojana : १० ऑक्टोबरला लाडक्या बहिणींच्या अकाउंटला ३००० रुपये जमा होणार; कसं? जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : १० ऑक्टोबरला लाडक्या बहिणींच्या अकाउंटला ३००० रुपये जमा होणार; कसं? जाणून घ्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२४ । राज्य सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सध्या संपूर्ण देशात चर्चा असून या योजनेद्वारे महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहे. योजनेतून ऑनलाईन आणि ऑफलाईन फॉर्म भरणाऱ्या १ कोटी ९६ लाख ४३ हजार २०७ बहिणींना तिसऱ्या टप्प्याचे पैसे त्यांच्या खात्यावर पाठविण्यात आले आहेत. त्यानंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लवकरच देणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे.

अजित पवारांनी बीडमधील माजलगाव येथील सभेत अजित पवारांनी याबाबत माहिती दिली आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी बहि‍णींना भाऊबीज म्हणून ३ हजार रुपये देणार आहे, असा अजित दादांचा वादा आहे, असं वक्तव्य अजित पवारांनी केले आहे. त्यामुळे आता दिवाळीपू्र्वी महिनांच्या खात्यात ३ हजार रुपये येणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

लाडकी बहीण ही योजना पुढील पाच वर्षे चालू राहील. भाऊबीजेची ओवाळणी म्हणून लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्याचे तीन हजार रुपये १० ऑक्टोबर रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी सांगितले.त्यामुळे आता लवकरच महिलांच्या अकाउंटला ३००० रुपये जमा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ज्या महिलांना अजून एकही रुपया मिळाला नाही त्यांना ४५०० रुपये मिळणार आहेत. तर ज्या महिलांना आतापर्यंत ३००० रुपये मिळालेत त्यांना १५०० रुपये मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेत तिसऱ्या हप्त्याच्या पहिल्याच दिवशी ५१२ कोटी रुपये दिले असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.