⁠ 
शनिवार, सप्टेंबर 21, 2024
Home | जळगाव जिल्हा | २३ सप्टेंबरपर्यंत भुसावळ मार्गे पुण्याकडे जाणाऱ्या या गाड्यांच्या मार्गात बदल

२३ सप्टेंबरपर्यंत भुसावळ मार्गे पुण्याकडे जाणाऱ्या या गाड्यांच्या मार्गात बदल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२४ । दौंड ते मनमाड स्टेशनदरम्यान असलेल्या राहुरी- पढेगाव स्थानकादरम्यान नॉन इंटरलिंकचे काम होणार असून यामुळे आज २१ ते २३ सप्टेंबर या काळात काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही रेल्वेचे मार्ग बदलण्यात आली आहे. यात भुसावळ मार्गे धावणाऱ्या काही गाड्यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.

शनिवारी म्हणजे आज दादर- साईनगर शिर्डी एक्सप्रेस, निजामाबाद- दौंड, पुणे-हजूरसाहिब नांदेड, हजूरसाबिह नांदेड- पुणे एक्सप्रेस या रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. तर रविवारी पुणे-हरंगुल एक्सप्रेस, हरंगुल-पुणे एक्सप्रेस, साईनगर शिर्डी-दादर एक्सप्रेस, दौंड-निजामाबाद,जबलपूर-पुणे विशेष लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. सोमवारी पुणे-हरंगुल एक्सप्रेस, पुणे-जबलपूर विशेष ट्रेन या रेल्वे रद्द केल्या आहेत.

काही ट्रेन रद्द तर काही ट्रेनचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
जम्मूतावी-पुणे झेलम एक्स्प्रेस : मनमाड-इगतपुरी-कल्याण-पनवेल-लोणावळामार्गे धावेल.
पुणे-हजूरसाहिब नांदेड एक्स्प्रेस : दौंड-कुर्डुवाडी-लातूर-परळी वैजनाथ-परभणीमार्गे धावेल.
हजूरसाहिब नांदेड-पुणे एक्स्प्रेस : परभणी-परळी वैजनाथ-लातूर-कुर्डुवाडी-दौंडमार्गे धावेल.
वास्को दा गामा-हजरत निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस : पुणे-लोणावळा-कर्जत-पनवेल-कल्याण-इगतपुरी आणि मनमाडमार्गे धावेल.
यशवंतपूर-अहमदाबाद एक्स्प्रेस : दौंड-पुणे-लोणावळा-कर्जत-कल्याण-वसई रोड आणि सुरतमार्गे धावेल.
हजरत निजामुद्दीन-हुबळी एक्स्प्रेस : मनमाड – इगतपुरी-कल्याण-पनवेल-लोणावळा- पुणे-दौंडमार्गे धावेल.
हजरत निजामुद्दीन – वास्को द गामा गोवा एक्स्प्रेस : मनमाड-इगतपुरी-कल्याण-पनवेल-लोणावळा-पुणेमार्गे धावेल.
निजामाबाद-दौंड : परभणी-परळी वैजनाथ-लातूर-कुर्डुवाडी-दौंडमार्गे धावेल.
दौंड-निजामाबाद : दौंड-कुर्डुवाडी-लातूर-परळी वैजनाथ-परभणी मार्गे धावेल.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.