⁠ 
[rank_math_breadcrumb]

विधानसभेसाठी वंचितची पहिली यादी जाहीर, रावेरमधून तृतियपंथीयाला उमेदवारी..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२४ । राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वी वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.वचिंतचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबई येथील पत्रकार परिषदेत विधानसभेसाठी ११ उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली. त्यात रावेरमधून तृतियपंथीयाला उमेदवारी जाहीर करण्यात आली. शमिभा भानुदास पाटील असं त्यांचं नाव आहे.

आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सर्वच पक्षांकडून विधानसभेची जोरदार तयारी सुरु झाली आहे. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात वंचितने राज्यातील ११ जागांवर उमेदवार दिले आहेत. यात प्रामुख्याने रावेर, नागपूर दक्षिण मध्य, वाशिम, शिंदखेड राजा, शेवगाव, नांदेड दक्षिण या जागांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे वंचितने रावेर मतदारसंघातून तृतीयपंथी उमेदवार रिंगणात उतरवला आहे. शमिभा पाटील असे वंचितच्या रावेर मतदारसंघातून लढणाऱ्या उमेदवाराचे नाव आहे. शमिभा भानुदास पाटील या एक मराठी पारलिंगी सामाजिक कार्यकर्त्या असून, तृतीयपंथी हक्क अधिकार समितीच्या राज्य समन्वयक संस्थापक आहेत. त्या 2019 पासून वंचित बहुजन आघाडी सोबत सक्रिय असून काम करत आहेत.

https://publish.twitter.com/?url=https://twitter.com/VBAforIndia/status/1837409180526805291#

उमेदवारांची नावे
रावेर – शमिभा पाटील
शिंदखेड राजा – सविता मुंढे
वाशिम – मेघा किरण डोंगरे
धामणगाव रेल्वे – निलेश विश्वकर्मा
नागपूर दक्षिण मध्य – विनय भागणे
साकोली – डॉ. अविनाश नान्हे
नांदेड दक्षिण- फारुख अहमद
लोहा – शिवा नारांगले
औरंगाबाद पूर्व- विकास रावसाहेब दांडगे
शेवगाव – किसन चव्हाण
खानापूर – संग्राम कृष्णा माने

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.