⁠ 
शनिवार, सप्टेंबर 21, 2024
Home | जळगाव जिल्हा | सर्वसामान्यांना धक्का; खाद्यतेलाच्या दरात पुन्हा वाढ, आता प्रति किलोचा भाव काय?

सर्वसामान्यांना धक्का; खाद्यतेलाच्या दरात पुन्हा वाढ, आता प्रति किलोचा भाव काय?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२४ । देशात सणासुदीला सुरुवात झाली असून गणेश चतुर्थीनंतर आता नवरात्रीचे आगमन होईल आणि दसरा, दिवाळी हे सण येतील. अशातच स्वयंपाकघरातील फोडणी महाग झाली आहे. गेल्या आठवड्यात ११० रुपये किलो असणारे सोयाबीन तेल १२५ रुपयांवर पोचले होते. मात्र आता पुन्हा यात वाढ झाली असून सोयाबीन तेलाचे दर शुक्रवारी १३० रुपयांवर पोचले आहे.

केंद्र सरकारने तेलावरील एक्साईज ड्युटी वाढवल्यामुळे ही दरवाढ झाली आहे. सोयाबीनचे भाव वाढविण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात खाद्यतेल आयात शुल्कावर २० टक्क्यांनी वाढ केली असून आता कच्चे सोयातेल, पामतेल व सूर्यफूल तेल यावर २७.५ टक्के आयात शुल्क लागणार असल्याचे जाहीर केले. यामुळे गेल्या आठ्वड्यात खाद्यतेलाची भाव २० ते २५ रुपयांनी वाढले होते.

त्यामुळे शुक्रवारी सकाळपर्यंत सोयाबीन तेलाचे भाव १२५ रुपयापर्यंत होते. मात्र काल त्यात पुन्हा ५ रुपयापर्यंतची वाढ झाली. यांनतर सोयाबीन तेलाचे दर आत १३० रुपयांवर पोचले आहे. सर्वसामान्य व्यक्ती महिन्याला काटकसर करून किराणा घेतो. महिन्याला साधारणत: चार ते पाच लिटर तेल लागते. आता तेल विकत घेताना वाढलेले दर पाहून सर्वसामान्यांना धक्काच बसला. दरवाढीमुळे महिन्याच्या बजेटमध्ये आणखी वाढ झाली आहे.

दरम्यान, दरवर्षीप्रमाणे सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या किंमतीत वाढ होत असते. मात्र यंदाच्या वर्षी सरकारने खाद्यतेल महाग होणार नाही याची काळजी घेतली आहे. सरकारने खाद्यतेलावर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांना अलीकडेच आयात शुल्क लागू केल्यानंतर खाद्यतेलाच्या किरकोळ किमतीत वाढ न करण्यास सांगितले आहे. कमी बेसिक कस्टम ड्युटीवर आधीच आयात केलेल्या सुमारे 30 लाख टन तेलाचा साठा आहे, जो 45 ते 50 दिवसांच्या घरगुती वापरासाठी पुरेसा आहे. त्यामुळेच सध्याचा साठा शिल्लक राहूपर्यंत खाद्यतेलाच्या किमती वाढवू नयेत अशा सक्त सूचना केंद्र सरकारने खाद्यतेल संघटनांना दिल्या आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.