जळगाव लाईव्ह न्यूज । १८ सप्टेंबर २०२४ । मागील काही दिवसापासून सोने आणि चांदी दरात चढ-उतार सुरु आहे. गेल्या आठवड्यात दोन्ही धातूंच्या दरात मोठी वाढ झाली. एकीकडे सणासुदीचे दिवस असताना सोन्यासह चांदीचे घेतलेल्या उसळीमुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. पण आता पितृपक्ष लागल्याने खरेदीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे लागलीच बेशकिंमती धातूच्या किंमतीत घसरण झाली.
गेल्या आठवड्यात सोने 900 रुपयांनी वाढले. तर 17 आणि 18 सप्टेंबर रोजी अनुक्रमे 110 आणि 160 रुपयांनी घसरण झाली. सोने एकूण 270 रुपयांनी उतरले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 68,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,880 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीने गेल्या आठवड्यात 7 हजारांची घौडदौड केली होती. त्यामुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाल होते. सोमवारी 16 सप्टेंबर रोजी चांदी 1 हजार रुपयांनी वधारली होती. तर 17 आणि 18 सप्टेंबर रोजी चांदी प्रत्येकी एक हजारांनी घसरली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 91,000 रुपये आहे.