⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | यावल | महिलेचे घरकूल अनुदान थांबविले ; मनवेल येथील जगन सोनवणेंचा आंदोलनाचा ईशारा

महिलेचे घरकूल अनुदान थांबविले ; मनवेल येथील जगन सोनवणेंचा आंदोलनाचा ईशारा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ जून २०२१ । यावल तालुक्यातील मनवेल गावात एका विधवा व निराधार महिलेच्या रमाई आवास घरकुल योजने अंतर्गत मजूर होवून बांधकाम सुरू असलेल्या घरकुलाचे अनुदान सरपंच व इतरांनी थांविल्याने असल्याचे आरोप करून हे  अनुदान मिळाले नाही तर शुक्रवार ४ जून पासून पंचायत समिती समोर विविध स्वरूपात आदोलन करण्याचा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टी (प्रा जोगेंद्र कवाडे सर) चे महामंत्री जगन सोनवणे यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

या संदर्भात प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांनी म्हटले आहे की, यावल तालुक्यातील मनवेल येथील राहना-या मंगलाबाई रामदास इधाटे या विधवा व निराधार महिलेचे रमाई या  योजनेअंतर्गत घरकूल मंजूर झाले आहे. असे असताना मात्र घरकुलाचे बांधकाम अध्यावर आलेले असताना ग्रामपंचायतीचे सरपंच जयसिंग देवराम सोनवणे आणि ग्रामसेवक यांनी सार्वजनिक मुतारीच्या विषयावरून काही ग्रामस्थांच्या तक्रारी झाल्याने अखेर या घरकुलाचे बांधकाम बंद झाल्याने उर्वरित मिळणारे अनुदान रूपाचे हफ्ते थांबविल्याने हे कामबंद करण्यात आले असल्याचे व्रत आहे.

याबाबत सदर मंगलाबाई सोनवणे या विधवा व निराधार महिलेने पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महामंत्री जगन सोनवणे यांच्याकडे आपल्याला घरकुलाचे उर्वरित हफ्ते व ग्रामपंचायतीने काम बंद पाडल्याची तक्रार केल्याने आज सोनवणे हे यावल येथे पंचायत समितीच्या कार्यालयात येऊन त्यांनी विस्तार अधिकारी के. स. सपकाळे यांची या निराधार महिलेच्या मंजूर झालेल्या रमाई घरकूल योजनेचे लाभ मिळण्यासाठी होत असलेल्या मानसिक त्रास व अडचनिबाबतची कल्पना दिली.

तात्काळ या घटनेची महिलेचे घरकुलाचे उर्वरित हफ्ते व बांधकाम सुरू न झाल्यास आपण शुक्रवार दिनांक. ४ जुन रोजी १० विविध संघटनाच्या माध्यमातून ताला टोको आदोलन करणार तसेच सोमवार दिनांक ७ जुन रोजी दुपारी २ वाजता यावल पंचायत समिती समोर हल्लाबोल आदोलन व गुरुवार दि. १० जुन रोजी सुमारे २०० स्री पुरूषांचे आमरण उपोषण करणार असल्याचे ईशारा यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.