⁠ 
शुक्रवार, ऑक्टोबर 18, 2024
Home | जळगाव जिल्हा | केंद्रीय नेतृत्वाचा ‘तो’ निर्णय आम्हाला मान्य ; ‘नाथाभाऊंच्या भाजप प्रवेशासंदर्भात देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान

केंद्रीय नेतृत्वाचा ‘तो’ निर्णय आम्हाला मान्य ; ‘नाथाभाऊंच्या भाजप प्रवेशासंदर्भात देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२४ । नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीवेळी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांची साथ सोडून पुन्हा भाजपात घरवापसीचे संकेत दिले होते. खडसे यांनी दिल्लीत जाऊन भाजप नेते अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेटही घेतली होती. या भेटीत खडसे यांच्या भाजप प्रवेशाला हिरवा कंदील देण्यात आला होता. मात्र, अद्याप त्यांचा भाजप प्रवेश झाला नाहीय.

आपला भाजप प्रवेश देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यामुळे रखडल्याचा आरोपही एकनाथ खडसे यांनी केला होता. आता या आरोपावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशासंदर्भात घेतलेला केंद्रीय नेतृत्वातील निर्णय आम्हाला मान्य आहे. त्यामुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासोबत चर्चा करून गणेशोत्सवानंतर त्यासंदर्भात योग्य निर्णय केला जाईल’, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

दरम्यान, एकनाथ खडसेंनी आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. “देवेंद्र फडणवीस यांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती”, असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला आहे. “फडणवीसांनी मला सांगितलं होतं की मी मनापासून प्रयत्न करेन. याशिवाय त्यांनी त्यांच्या मुलीची शपथ घेऊन मला राज्यपालपदाबाबत आश्वासन दिलं होतं” असंही एकनाथ खडसे म्हणाले. खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी भाजपात परतण्याची पूर्ण तयारी केली होती. मात्र पक्षांतर्गत विरोधामुळे त्यांच्यासाठी भाजपाचे दरवाजे उघडले गेले नाहीत. परिणामी खडसे शरद पवार गटात परत गेले. दरम्यान, आता खडसे यांनी दावा केला आहे की महाराष्ट्र भाजपातील वरिष्ठ नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांना राज्यपालपद देण्याचं आश्वासन दिलं होतं.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.