⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | ग्राहकांना झटका! जळगावात चांदी दरात ६००० रुपयाची वाढ, सोने दरातही मोठी वाढ

ग्राहकांना झटका! जळगावात चांदी दरात ६००० रुपयाची वाढ, सोने दरातही मोठी वाढ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२४ । देशभरात सणासुदीचे दिवस सुरु असून अशातच सोने आणि चांदी दराने पुन्हा उसळी घेतली. जळगावच्या सुवर्णनगरीत गेल्या दोन दिवसात सोने दरात तब्बल १२०० रुपयापर्यंतची वाढ झाली. तर चांदी दरात ६००० रुपयाची वाढ झाली. यामुळे बाजार पेठेत खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना मोठा झटका बसला.

शुक्रवारी चांदीच्या दरात ४,४०० रुपयांनी वाढ झाली. तर सोन्याचे दर १ हजार रुपयांनी वाढले. सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी चांदीमध्ये १६०० रुपयांनी तर सोन्याच्या दरात २०० ची दरवाढ झाली. चांदी ८८ हजार ६०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. दुसरीकडे सोने २०० रुपयांनी वधारून ते ७४ हजार १०० रुपये प्रति तोळा झाले आहे.

सोने चांदी दरवाढीचे कारण काय?
अमेरिकन अर्थव्यवस्था अधिकच डळमळत असल्याने बँकांचे व्याजदर आणखी कमी होण्याच्या शक्यतेने सोने-चांदीत गुंतवणूक वाढत असल्याने सोन्या चांदीच्या दरात वाढ होत असल्यास सुवर्ण व्यवसायिकाचं म्हणणं आहे. या दरवाढीमुळे चांदी पावणे दोन महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.