जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२४ । देशभरात सणासुदीची धामधूम सुरू झाली असून यातच सोने दराने पुन्हा उसळी घेतली आहे. यामुळे सणासुदीच्या काळात खरेदी करण्याच्या उत्साहावर मात्र दरवाढीने पाणी फेरले गेले. परंतु आज सोने दरात किंचित दिलासा मिळाला आहे. तीन दिवसांच्या दमदार बॅटिंगनंतर आज सोने दरात घसरण दिसून आली.
सोन्यात आली स्वस्ताई
ऐन सणासुदीत सोने चमकले. सोन्यात दरवाढ झाली. 10 सप्टेंबर रोजी सोने 440 रुपयांनी उतरले. 11 सप्टेंबर रोजी सोने 380 रुपयांनी वधारले. तर 12 सप्टेंबर रोजी त्यात किंचित घसरण झाली. आज सकाळच्या सत्रात सुद्धा भाव उतरल्याचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,200 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,300 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
या आठवड्यात चांदीने दमदार कामगिरी बजावली. 9 सप्टेंबरला चांदी 500 रुपयांनी वाढली. 10 सप्टेंबरला 1 हजारांनी चांदी महागली. 11 सप्टेंबर रोजी 500 रुपयांनी किंमत वधारली. तर 12 सप्टेंबर रोजी भाव स्थिर होता. आज सकाळच्या सत्रात त्यात घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 86,500 रुपये आहे.