जळगाव लाईव्ह न्यूज । ९ सप्टेंबर २०२४ । गणेशोत्सवासाठी केल्या जाणाऱ्या गोड पदार्थात वापरला जाणारा सुकामेवा यंदा भक्तांचा खिसा हलका करीत आहे. सर्वच सुकामेवाच्या दरात २५ ते ३० टक्के वाढ झाली आहे. प्रामुख्याने काजू, बदाम व अंजीर यांच्या दरातील वाढ मोठी आहे. परिणामी मोदकासह प्रसादासाठीचे गोड पदार्थ महागले आहेत.
प्रसादात काजूला सर्वाधिक मागणी असते. मात्र मागील महिन्यात ७५० ते ८०० रुपये प्रति किलो असलेला काजू आता किमान ९५० रुपये प्रति किलो झाला आहे. ९५० रुपयांत तुकडा काजू आहे. चांगल्या व मोठ्या काजूचे दर १ हजार ते १०५०-११०० रुपये प्रति किलोवर गेले आहेत. अनेक ठिकाणी मोदकात नारळाच्या सालनासह अंजीरचे तुकडे टाकले जातात. मात्र हा अंजीरही १६०० रुपये प्रति किलोवर गेला आहे.