बातम्या

जळगाव हादरले ! घरात कोंडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, संशयित नराधमाला मुंबईतून अटक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२४ । राज्यात महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीय. अशातच जळगाव शहरातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. शहरातील एका ११ वर्षीय मुलीला घरात कोंडून ४० वर्षीय व्यक्तीने तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडलीय. १७ दिवसांनी ही घटना उघडकीस आली असून याप्रकरणी संशयित नराधमाबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला मुंबईहून पोलिसांनी अटक केली आहे.

नेमकी घटना काय?
पिडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. दि. १२ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते ६ वाजेच्या दरम्यान, रामानंदनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत संशयित आरोपीच्या मुलासोबत अकरा वर्षाची शेजारी राहणारी मुलगी आणि काही मुलं लपंडावाचा खेळ खेळत होती. तेव्हा संबधित मुलगी संशयित आरोपीच्या घरात लपायला गेली होती. त्याच वेळेस संशयित आरोपीने हा घरात आला. त्याने त्या मुलीला पाहिल्यानंतर घराचा दरवाजा बंद केला. तसेच घरातील सर्व लाईट देखील बंद करत, मुलीवर अत्याचार केले.

तसेच पिडीत मुलीने आरडाओरड केला. तेव्हा संशयित आरोपीच्या हातावर नखांनी ओरखडले. संशयिताने मुलीचे तोंड दाबून, तिला जीवे ठार मारण्याची धमकी देत, शांत राहण्यास सांगितले. ही माहिती काही दिवसानंतर पिडीत मुलीच्या आई-वडिलांना कळल्यानंतर बुधवारी रामानंदनगर पोलिस स्टेशनमध्ये संबधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी काही दिवसांपासून मुंबईला पळून गेला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला गुरुवारी मुंबईहून अटक केली आहे. आज शुक्रवारी न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे. पुढील तपास सुरु असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत यांनी दिली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button