बातम्या

दुर्दैवी! पुलाच्या बांधकामासाठी केलेल्या खड्ड्यात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२४ । म्हशी चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा पुलाच्या बांधकामासाठी केलेल्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जळगाव तालुक्यातील कडगाव येथे घडलीय. संतोष यादव धनगर (वय-५५,रा.कडगाव ता. जळगाव) असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हे काम अपूर्ण राहिल्याने ही घटना घडल्याचा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. जोपर्यंत ठेकेदारावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्र नातेवाईकांनी घेतला आहे. यासंदर्भात नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

घटनेबाबत असे की, कडगाव येथील रहिवाशी असलेले संतोष धनगर हे नेहमीप्रमाणे दुपारी म्हशी चारण्यासाठी गेले होते. त्यानंतर सायंकाळी परत येत असताना जोगलखेडा ते कडगाव रस्त्यावरील पुलाचे काम करण्यासाठी केलेल्या खड्ड्यात त्यांच्या म्हशी गेल्या होत्या. पाण्यात गेलेल्या म्हशी या गाळात बसल्याने त्यांना काढण्यासाठी संतोष धनगर हे गेले असता, त्यांच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

दरम्यान या रस्त्याने गावातील ग्रामस्थ ये जा करत असताना ही घटना त्यांच्या लक्षात आल्यामुळे गावातील ग्रामस्थ एकत्र येऊन संतोष धनगर यांना खड्ड्यातील पाण्यातून बाहेर काढले. यावेळी संबंधित ठेकेदाराने हे काम अपूर्ण ठेवल्यामुळे एकच संताप व्यक्त केला होता जोपर्यंत संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा नातेवाईक व ग्रामस्थांनी घेतला होता. या घटनेबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात पत्नी मालती, मुलगा जयेश असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हाड हाड व्यक्त केली जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button