शंकरा आय हॉस्पिटलला मंत्री गुलाबराव पाटीलांची भेट
जळगाव लाईव्ह न्यूज । पनवेल (मुंबई) येथील डोळ्यांसाठी प्रसिद्ध असलेले आर झुणझुणवाला ट्रस्टचे शंकरा आय हॉस्पिटलला राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराब पाटील यांनी भेट दिली. यावेळी जळगाव ग्रामीण मतदार संघातील गरीब व गरजू रुग्णांचे मोफत डोळ्याचे ऑपरेशन कसे होते ? त्यांची राहण्याची व जेवणाची सोय कशी असते ? याची माहिती जाणून घेतली.
मंत्री गुलाबराव पाटील यांनी गेल्या 9 महिन्यापासून शेकडो रुग्णांना मोफत मोतिबिंदू ऑपरेशन करवून त्यांना नवी दृष्टी दिली. मतदारसंघात आपल्या नागरिकांचे आपण काही देणे लागतो हाच उद्दीष्ट डोळ्या समोर ठेऊन सतत अशी रुग्ण सेवा करीत असतात. याच निमित्ताने आज हॉस्पिटलमध्ये जाऊन तेथील ट्रस्टी व व्यवस्थापक यंत्रणा व डॉक्टर मंडळी यांचे आभार मानले. निरंतर अशीच रुग्ण सेवा कायम सुरू राहील अशी ग्वाही दिली. हॉस्पिटल साठी वेळोवेळी सहकार्याची भावना व्यक्त केली. ही भावना व्यक्त करतांना मतदारसंघातील रुग्णांचे डोळे अक्षरशः पाणावले होते.
हॉस्पिटलचे डॉ. राजेश कापसे, डॉ. प्राजक्ता परितेकर, डॉ. नारायण, डॉ. गिरीश बुधराणी, डॉ. प्रकाश पाटील, अश्विन पवार, डॉ. वसीम सैयद, डॉ. राहुल चौधरी, डॉ ऋषिकेश झंवर आदी उपस्थित होते.माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जीपीएस मित्र परिवार या उपक्रमासाठी सहकार्य करीत आहे.