⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024
Home | बातम्या | महाविकास आघाडीकडून येत्या 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक

महाविकास आघाडीकडून येत्या 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑगस्ट २०२४ । बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतील स्वच्छतागृहातील स्वच्छता कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आल्यामुळे खळबळ उडाली. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. राज्यभरातून या घटनेचा निषेध केला जात आहे. यातच बदलापूर प्रकरणी महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा झाली.

त्यात बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणी येत्या 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असल्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.आघाडीचे सगळे पक्ष या बंदमध्ये सहभागी होणार आहेत.

बदलापुरातील घटना ही महाराष्ट्रालाच काळीमा फासणारी आहे. मला या घटनेत राजकारण करायचं नाही. मात्र, महाराष्ट्राची प्रतिमा मलीन करण्याचं काम रोज राज्यात होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्राला, शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या महाराष्ट्राला अपमानित आणि काळ लावण्यात येत आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. या गंभीर प्रश्नावर आम्ही महाविकास आघाडीमध्ये चर्चा केली आणि येत्या 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक आम्ही दिली असल्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

या आंदोलनात महाविकास आघाडीतील सर्व मित्र पक्ष, घटक पक्ष, अनेक संघटना, शाळा कॉलेज, दुकानदार आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतील. असा विश्वासही नाना पटोले यांनी बोलताना व्यक्त केला.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.