जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२१ । नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वात केंद्रात सरकार स्थापन होवून 7 वर्ष पुर्ण झाले.या सरकार च्या या सात वर्षांच्या कालावधीत गरीब जनतेला मोफत धान्य, शेतकरी बांधवांना आर्थिक सहकार्य, कोरोना काळात अनाथ मुलांना शिक्षण मोफत व आर्थिक मदत ,राम मंदिराचा निर्माण करण्याचा निर्णय, 370 कलम रद्द, असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. व सध्या सुरू असलेल्या कोरोना काळात जनतेने नियम पाळावे म्हणून सावदा शहरा मध्ये मोदी सरकारची सात वर्ष पुर्ण झाले बद्दल गरीब उतारकरू नागरीकांना, तसेच अपंग बांधवांना मास व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी मा.नगराध्यक्ष व नगरसेवक राजेंद्र चौधरी,विनोद नेमाडे, भरत भंगाळे,लतेष चौधरी,गजानन ठोसरे,सागर चौधरी, अक्षय सरोदे,सर्वेश लोमटे, अजय कासार,संतोष परदेशी,गजानन भार्गव,महेश अकोले,विजय पाटील, तसेच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.