जळगाव जिल्हा

भुसावळ विभागातील प्रवाशांना दिलासा! 84 रेल्वे गाड्यांना प्रत्येकी 4 वाढीव जनरल डबे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२४ । सर्वसामान्य प्रवाशांची जागेची अडचण सोडवण्यासाठी मध्य रेल्वेने ८४ मेल, एक्स्प्रेस गाड्यांना डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून प्रत्येकी चार जनरल डबे (सामान्य श्रेणी) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भुसावळ विभागातील प्रवाशांना दिलासा मिळेल.

या गाड्यांचे डबे वाढतील?
मुंबई- भुवनेश्वर मुंबई कोणार्क एक्स्प्रेस, मुंबई गोंदिया मुंबई विदर्भ एक्स्प्रेस, मुंबई- अमृतसर – मुंबई एक्स्प्रेस, मुंबई – अयोध्या छावणी साकेत एक्स्प्रेस, एलटीटी बलिया कामायनी एक्स्प्रेस, एलटीटी- बल्हारशाह, एलटीटी छपरा, एलटीटी – गोरखपूर गोदान एक्स्प्रेस, एलटीटी गोरखपूर, एलटीटी अयोध्या छावणी तुलसी एक्स्प्रेस, एलटीटी गोरखपूर, एलटीटी अयोध्या छावणी एक्स्प्रेस, एलटीटी – सुलतानपूर अतिजलद, एलटीटी- जयनगर, एलटीटी- गोरखपूर अतिजलद, एलटीटी- सीतापूर, एलटीटी प्रतापगड, एलटीटी – आग्रा कैंट लष्कर एक्सप्रेस, एलटीटी – राणी कमलापती भोपाळ एक्स्प्रेस, एलटीटी बनारस, एलटीटी पाटलीपुत्र, एलटीटी शालीमार ज्ञानेश्वरी एक्सप्रेस, एलटीटी शालीमार अतिजलद, एलटीटी पुरी, सीएसएमटी अमरावती अतिजलद, मुंबई नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस, पुणे- काझीपेठ अशा गाड्यांना डबे वाढतील

प्रशासनाने का घेतला निर्णय?
कन्फर्म आरक्षित तिकीट असेल तरच प्रवाशांना आरक्षित डब्यातून प्रवास करता येतो. वेटिंग तिकिटावर आरक्षित डब्यातून प्रवास नियमबाह्य ठरतो. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी जनरल डब्यांची संख्या वाढवण्यात येत आहे.

उद्या ब्लॉक, ६ गाड्या विलंबाने
भुसावळ विभागातील शेगाव ते जलंब दरम्यान रेल्वे प्रशासनाने १० रोजी विशेष ब्लॉक घेतला आहे. यामुळे बडनेरा – नाशिक विशेष गाडी ४० मिनिटे, हटिय हटिया – पुणे एक्सप्रेस १ तास ४५ मिनिटे, गोंदिया- कोल्हापूर महाराष्ट्र एक्प्रेस १ तास ३० मिनिटे, गांधीधाम पुरी एक्सप्रेस १ तास ४५ मिनिटे, श्रीगंगानगर नांदेड एक्स्प्रेस १ तास १० मिनिटे, बडनेरा भुसावळ मेमू ३० मिनिटे गरजेनुसार कोणत्याही स्थानकावर थांबवण्यात येईल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button