जळगाव जिल्हा

डॉ केतकी पाटीलांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय योजना नोंदणी शिबिराचे आयोजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । केंद्रासह राज्यातील महायुती सरकारने जनतेच्या हितासाठी तयार केलेल्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यावल, रावेर तालुक्यासह विविध ठिकाणी शुक्रवार दिनांक ९ ऑगस्ट रोजी नोंदणी शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे.

लोक कल्याणकारी शासनाच्या विविध योजना आहेत. परंतु अनेकदा लाभार्थ्यांना त्याबाबत संपूर्ण माहिती मिळत नाही. त्याकरिता शासकीय योजना नोंदणी शिबीर आयोजित करण्याचा स्तुत्य उपक्रम डॉ केतकीताई पाटील यांनी केला आहे. नुकत्याच विविध योजना शासन जाहीर करत आहे, त्याचा लाभ जनसामान्यांना मिळावा या साठी ५० हुन अधिक लहान मोठ्या गावांमध्ये शिबीर आयोजित करण्यात आली आहे. तरी नागरिकांनी आपले आधार कार्ड, राशन कार्ड यासह आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या ठिकाणी होणार शिबिरं
रावेर तालुक्यातील शिंदखेडा, मुंजलवाडी, लालमाती, सहस्त्रलिंगी, भातखेडा, उटखेडा, कोचुर, रझोदा, सावखेडा. वडगाव, वाघोदा, कुसूंबा, पाल, विवरा, केऱ्हाळा, गौरखेडा, लोहार यासह यावल तालुक्यात फैजपूर, बामणोद, न्हावी, मारूळ, यावल, पाडल्सा, हिंगणा, भालोद तसेच मुक्ताईनगर, कुर्हाकाकोडा, जामनेर तालुक्यातील नेरी बुद्रुक, नेरी दिगर, पहूर, बोदवड तालुक्यातील कोल्हाडी, भुसावल तालुक्यातील पिंपळगाव, साक्री, नांदुरा तालुक्यातील निमगाव, हिंगणे गव्हाळ,चोपडा शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी, मलकापूर तालुक्यातील घिर्णी
या ठिकाणी शासकीय योजनांसाठी नोंदणी शिबीर होणार आहे.

योजनांचा लाभ घ्या
शासनाने विविध क्षेत्रातील जसे कि शैक्षणिक, कृषी, बांधकाम यासह महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजना जाहीर केलेल्या आहेत. कोणती योजना आपल्यासाठी आहे ? त्यासाठी कुठले कागदपत्र लागणार ? या बाबत सविस्तर माहिती देण्यासाठी गावा-गावांमध्ये शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व जनतेने शिबिरात येऊन लाभ घ्यावा. शासन सर्वांचा विकास करण्यासाठी तत्पर आहे.
-डॉ केतकी ताई पाटील,
प्रदेश उपाध्यक्ष, भाजपा महिला मोर्चा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button