⁠ 
रविवार, नोव्हेंबर 10, 2024
Home | बातम्या | स्वस्त कर्जाच्या प्रतीक्षेत असलेल्यांना धक्का; RBI कडून रेपो दराबाबत मोठी घोषणा

स्वस्त कर्जाच्या प्रतीक्षेत असलेल्यांना धक्का; RBI कडून रेपो दराबाबत मोठी घोषणा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑगस्ट २०२४ । भारतीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा ग्राहकांच्या पदरात निराशा टाकली.RBI ने आज गुरुवारी रेपो दर जाहीर केला. त्यात रेपो दरात कुठलाही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला. रेपो दर जैसे थे असतील, परिणामी कर्जावरील EMI कमी होणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. रेपो दर हा पूर्वीसारखाच 6.5 टक्के इतका असेल.

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) चा तीन दिवसांचा द्वि-मासिक पतधोरण आढावा आज संपला. यावेळी RBI ने पुन्हा एकदा रेपो दरात बदल केलेला नाही. ही सलग आठवी वेळ आहे जेव्हा रेपो दर 6.5 टक्क्यांच्या पातळीवर कायम ठेवण्यात आला आहे.

आरबीआय प्रमुख शक्तिकांत दास यांनी एमपीसीमध्ये घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, चलनविषयक धोरण पुनरावलोकन(MPC)च्या बैठकीत रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्यवर्ती बँकेने फेब्रुवारी 2023 मध्ये रेपो दर 6.5 टक्क्यांपर्यंत वाढवला होता. तेव्हापासून ते याच पातळीवर राहिले आहे

स्वस्त कर्जाच्या प्रतीक्षेत असलेल्यांना धक्का
दरम्यान, स्वस्त गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज किंवा कार कर्जाच्या प्रतीक्षेत असलेल्यांना आरबीआयने घेतलेल्या निर्णयामुळे धक्का बसला आहे. महागाईशी संबंधित चिंता आणि आर्थिक वाढीचा वेग पाहता, यावेळी व्याजदरात बदल होण्याची अपेक्षा फार कमी होती. गोल्डमन सॅक्सने रेपो दर जुन्या पातळीवरच राहण्याची शक्यता आधीच व्यक्त केली होती. महागाईचा दर ५ टक्के आहे. महागाईचा दर खाली आल्यास रेपो दर कमी करणे मध्यवर्ती बँकेला सोपे जाईल.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.