भुसावळमार्गे उधनापर्यंत धावणाऱ्या दोन रेल्वे गाड्यांना मुदतवाढ
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जुलै २०२४ । पावसाळ्यात प्रवाशांची सोय लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. यात भुसावळ मार्गे सुरतमधील उधना स्टेशनपर्यंत धावणाऱ्या दोन रेल्वे गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. उधना-छपरा (अनारक्षित) आणि मालदा टाऊन-उधना या गाड्यांचा समावेश आहे. यामुळे भुसावळसह जळगावातील प्रवाशांची सोय झाली आहे.
उधना-छपरा (अनारक्षित) एकूण १२ फेऱ्या करणार आहेत. त्यामुळे अमळनेर, भुसावळ येथील प्रवाशांची सोय होणार आहे. गाडी क्रमांक ०९०४१ उधना-छपरा स्पेशल उधना येथून दर रविवारी ११.१५ वाजता सुटेल आणि छपरा येथे दुसऱ्या दिवशी १९.०० वाजता पोहोचेल. ही रेल्वे २१ जुलै ते २५ ऑगस्टपर्यंत धावणार आहे. गाडी क्रमांक ०९०४२ छपरा-उघना विशेष गाडी दर सोमवारी छपरा येथून २३.०० वाजता सुटेल आणि बुधवारी उधना येथे ६.४५ वाजता पोहोचेल. ही रेल्वे २२ जुलै ते २६ ऑगस्टपर्यंत धावणार आहे.
तर ०३४१८/१७ मालदा टाऊन-उधना या गाडीला २६ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलीय. तसेच उधना-मालदा टाऊन ही गाडी २६ नोव्हेंबरपर्यंत धावणार आहे.