जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२४ । जळगाव तालुक्यातील उमाळे गावानजीकच्या पाझर तलावाजवळ ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. अनिल कमलाकर जाधव (वय-३५, रा. उमाळे ता.जि. जळगाव) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, तरूणाचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप समोर आलेले असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.
याबाबत असे की, जळगाव तालुक्यातील उमाळे गावात आई-वडील यांच्यासह वास्तव्यास असलेला अनिल जाधव हा तरूण शेतमजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. दरम्यान सोमवारी २२ जुलै रोजी रात्री तो घरातून बाहेर निघून गेला. दुसऱ्या दिवशी आज मंगळवारी २३ जुलै रोजी सकाळी ७ वाजता उमाळे गावापासून जवळ असलेल्या एका पाझर तलावाजवळ त्याचा मयतस्थितीत मृतदेह आढळून आला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावातील तरुणांनी घटनांसाठी धाव घेतली. त्यानंतर त्याला उचलून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. दरम्यान याबाबत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते. त्याचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप समोर आलेले नाही. परंतू तो अविवाहित असल्या कारणामुळे काही दिवसांपासून मानसिक तणावात होता अशी माहिती गावातील मित्रपरिवाराने दिली. मयत अनिल जाधव यांच्या पश्चात आई मंगलाबाई, वडील कमलाकर जाधव, दोन भाऊ निलेश आणि संजय आणि विवाहित बहीण असा परिवार आहे.