जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२४ । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. तरुणांसाठी रोजगारापासून ते महिला सक्षमीकरणापर्यंत प्रत्येक घटकासाठी या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणांचा पाऊस पाडण्यात आला. तसेच अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात अनेक उत्पादने आणि सेवांवरील करांमध्येही बदल करण्याची घोषणा केली. करात कपात केल्यामुळे अनेक उत्पादने आता स्वस्त होणार आहेत. करवाढीमुळे अनेक उत्पादनांच्या किमती वाढणार आहेत. या अर्थसंकल्पात स्वस्त काय, महाग काय झाले याची यादी पहा.
अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात अनेक वस्तूंच्या किमती कमी करण्याचे संकेत दिले. कॅन्सरची औषधे स्वस्त होणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. तसेच मौल्यवान धातूंवरील सीमाशुल्क 6 टक्क्यांनी कमी करण्यात येणार असून त्यामुळे सोन्या-चांदीच्या किमती कमी होतील. याशिवाय सध्याच्या काळात मोबाईल ही प्रत्येक व्यक्तीची मोठी गरज बनली आहे. या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी मोबाईलचे पार्ट्स आणि लिथियम बॅटरी स्वस्त झाल्याची चर्चा केली आहे. सरकारने मोबाईल आणि चार्जरवरील कस्टम ड्युटी 15 टक्क्यांवर आणली आहे. यामुळे आगामी काळात कमी किमतीत मोबाईल खरेदी करता येणार आहे.
काय काय स्वस्त झालंय?
स्वस्त
मोबाईल फोन
चार्जर
इलेक्ट्रीक वाहनं
सौरऊर्जा पॅनल
एक्स रे मशीन
चामड्यापासून बनवलेल्या वस्तू
तांब्यापासून बनवलेल्या वस्तू, सोनं आणि चांदीचे आणि प्लॅटिनमचे दागिने
लिथियम बॅटरी
माशांपासून बनवलेली उत्पादनं
कॅन्सरची तीन औषध स्वस्त होणार आहेत. या औषधांवर कस्टम ड्युटी लागणार नाही. त्यामुळे कॅन्सर रुग्णांसाठी ही अत्यंत महत्वाची बाब आहे. तर पीवीसी फ्लेक्स बॅनर महाग होणार आहेत.
काय होणार महाग
प्लास्टिक महाग होणार
टेलिकॉम उपकरणांवरील कस्टम ड्युटी 15 टक्क्यांनी वाढलं
स्टॉक मार्केटमधून इनकम होणाऱ्यांसाठी वेगळा टॅक्स भरावा लागणार त्यावरील कर वाढवण्यात आला आहे.