⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | राशिभविष्य | आजचे राशिभविष्य : ३१ मे २०२१

आजचे राशिभविष्य : ३१ मे २०२१

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मेष

आजचा आपला दिवस कर्माला प्राधान्य देणारा असेल. आज कामाला जास्त महत्त्व द्याल. अनेक महत्त्वाची कामे हातावेगळी करण्याकडे कल राहीलं.

वृषभ

आज भाग्य व नशीबाची अपेक्षित साथ लाभल्याने लाभ व यशप्राप्ती संभवते. गेल्या अनेक दिवसांपासून घेत असलेल्या परिश्रमांचे आज सार्थक होईल. त्यामुळे आनंदून जाल.

मिथुन

आजच्या दिवशी काही शारीरिक, मानसिक अस्वस्थता जाणवेल. कामाचा अतिरिक्त तणाव जाणवेल. काहीशी द्विधा मनस्थिती आज राहील. प्रलोभनांपासून दूर राहा.

कर्क

आज वैवाहिक जोडीदाराचे उत्तम सहकार्य आपणास लाभेल. आपणही जोडीदाराला भरभरून प्रेम द्याल. आपल्या वैवाहिक जीवनात दोघांमधील प्रेम वृद्धिंगत होईल.

सिंह

आजच्या दिवशी काहीसे प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल. कामाच्या अतिरिक्त तणावाने आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तब्येतीची योग्य ती काळजी घेणे आवश्यक राहील.

कन्या

आजचा आपला दिवस चांगला असेल. उत्तम संततीसौख्य प्राप्त होईल. मुलांसमवेत मौजमस्ती करत आनंदात दिवस व्यतीत कराल. कलाक्षेत्रातील मंडळींसाठी आश्वासक दिवस असेल.

तुळ

आज आपल्या घरातील वातावरण आनंदी, प्रसन्न, चैतन्यमय असेल. बऱ्याच दिवसांपासून घरातील काही अडकलेली, रेंगाळलेली कामे पूर्ण करण्याकडे कल राहील.

वृश्चिक

आजचा आपला दिवस पराक्रमाचा, धडाडीचा असेल. आपल्या मूळ स्वभावाला अनुसरून आज एखादे महत्त्वाचे, धाडसी पाऊल उचलाल.

धनु

आज कौटुंबिक सौख्याचा आस्वाद घ्याल. कुटुंबीयांसमवेत आजचा दिवस आनंदात, मजेत घालवाल. परिवारातील सदस्यांच्या आवडीनिवडी जपण्यासाठी आज प्रयत्न कराल.

 मकर

बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आजचा सुंदर दिवस आलेला आहे. आज स्वतःच्या आवडीनिवडी जोपासण्यासाठी वेळ काढाल. एक नावीन्यपूर्ण उत्साहाचा अनुभव आजच्या दिवशी घ्याल.

कुंभ

आजचा दिवस काहीसा शारीरिक, मानसिक तणावाचा जाऊ शकतो. आज अचानक काही अनपेक्षित खर्च उभे ठाकतील. काही चिंता सतावतील.

मीन

आजच्या दिवशी उत्तम भौतिक सुखांची प्राप्ती संभवते. इतक्या दिवसांपासून घेत असलेल्या मेहनतीची शुभ फलिते आज प्राप्त होतील. त्यातुन आनंदाची व सुखाची अनुभूती घ्याल.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.