⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | शेळगाव सरपंचांसह कानसवाडे येथील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

शेळगाव सरपंचांसह कानसवाडे येथील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । शेळगाव येथील सरपंच संजय कोळी यांच्यासह शेळगाव व कानसवाडे येथील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पालकमंत्री तथा शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी हा प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ना. पाटील यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात होत असलेल्या विकास कामांमुळे जनसामान्यांमध्ये त्यांच्याबद्दल मोठा आदर आहे. त्यांच्या विकासात्मक राजकारणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही शिवसेनेत प्रवेश केला असल्याची प्रतिक्रीया यावेळी कार्यकर्त्यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीनंतर जळगाव व धरणगाव तालुक्यात शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरु झाले आहे. शेळगाव सरपंचांसह कानसवाडे येथील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी सरपंच संजय रामचंद्र कोळी, उपसरपंच गणेश रुपसचंद पाटील, माजी सरपंच हरीश रुपचंद कोळी, सदस्य ज्ञानेश्वर तुकाराम कोळी व कौतीक भिला धनगर यांचा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिवसेनेच्या ध्येय धोरणानुसार काम करून सरपंच, उपसरपंच यांनी गाव विकासासाठी तत्पर राहून कार्य करावे. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

यावेळी शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सपकाळे, माजी उपसरपंच युवराज कोळी, शिवसेना तालुका संघटक रवींद्र चव्हाण, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, सरपंच संघटनेचे सचिन पवार, युवासेनेचे तालुका प्रमुख आबा माळी, आदी मान्यवर उपस्थित होते.

कानसवाडे येथील शेकडो कार्यकर्ते यांचा शिवसेनेत प्रवेश
सरपंच संजय रामचंद्र कोळी, उपसरपंच गणेश रुपसचंद पाटील, माजी सरपंच हरीश रुपचंद कोळी, ज्ञानेश्वर तुकाराम कोळी, कौतीक भिला धनगर, युवराज कोळी, शिवसेना तालुका संघटक रवींद्र चव्हाण, संजय पाटील, सचिन पवार, आबा माळी, नरेंद्र गुरुजी उपस्थित होते

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.