⁠ 
रविवार, ऑक्टोबर 6, 2024
Home | गुन्हे | कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या तरुणावर काळाची झडप ; अपघातात मृत्यू

कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या तरुणावर काळाची झडप ; अपघातात मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जुलै २०२४ । रस्त्यात अचानक कुत्रा आडवा आल्यामुळे कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकी घसरून अपघात झाला. या अपघातात जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. गणेश घनश्याम सोनार (वय २६) असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना जळगाव ते कुसुंबा दरम्यान घडली.

गणेश सोनार हा कुसुंबा गावात आई आणि बहिणीसोबत वास्तव्यास होता. दरम्यान जळगावात खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर काम करून मिळणाऱ्या पैशातून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. रविवारी खवय्यांची गर्दी होत असल्याने रात्री घरी जाण्यास उशीर झाला होता. मात्र सर्व काम आटोपून गणेश हा रात्री दहाच्या सुमारास जळगाववरून कुसुंबा येथे घरी जाण्यासाठी निघाला. मात्र जळगाव- संभाजीनगर महामार्गावरील विमानतळाजवळ आला असता रस्त्यावर कुत्रा समोर आला.

रात्रीच्या अंधारात महामार्गावरून दुचाकी चालवीत असताना अचानक कुत्रा समोर आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकी रस्त्यावर घसरली. यात तो खाली पडला. यानंतर त्याला जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. घरातील कमावता व्यक्ती गेल्याने कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती जाणून घेतली.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.