जळगाव जिल्हा

रेल्वे प्रवाशांना दिलासा! भुसावळ मार्गे धावणाऱ्या सहा विशेष गाड्यांना मुदतवाढ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२४ । प्रवाशांचा वाढता प्रतिसाद व मागणीमुळे आणि अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ६ विशेष गाड्यांना मुदतवाढ दिली आहे. विशेष या गाड्यांना भुसावळसह जळगाव स्थानकांवर थांबा आहे.

या गाड्यांचा समावेश
गाडी क्र.०७०५५ काचीगुडा – लालगड साप्ताहिक विशेष २७ जुलैपर्यंत, तर गाडी क्र. ०७०५६ लालगड काचीगुडा साप्ताहिक विशेष २८ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. गाडी क्र. ०४७१५ बिकानेर साईनगर शिर्डी साप्ताहिक गाडीला २७ जुलै, तर गाडी क्र. ०४७१६ साईनगर शिर्डी बिकानेर – साप्ताहिक गाडीला २८ जुलैपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.

तसेच मुंबई ते रिवा आणि पुणे आणि जबलपूर दरम्यान धावणाऱ्या विशेष गाड्यांचा कालावधीत वाढ केली आहे. या गाड्यांच्या ५२ फेऱ्या वाढवल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-रिवा विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दर शुक्रवारी सुटणार आहे. ही गाडी २८ जूनपर्यंत होती, त्यात वाढ केली असून, ही गाडी आता २७ सप्टेंबरपर्यंत धावणार.

या गाड्यांची वेळ, थांबा आणि रचना यामध्ये कोणताही बदल केलेला नाही. प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या सर्व गाड्या भुसावळ विभागातून धावणाऱ्या आहेत. त्यामुळे चाकरमान्यांना त्यांचा लाभ होईल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button